Palghar News : भीषण पाणी टंचाईत कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया; कोकण पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

Palghar News : कालव्यांची आणि कालव्यांमध्ये असलेल्या लोखंडी गेटची दयनीय अवस्था झाली असल्याने या कालव्यांमधून लाखो लिटर पाणी वाया जाऊन त्याची नासाडी होत असल्याच समोर आल आहे
Palghar News
Palghar NewsSaam tv

पालघर : राज्यात सध्या भीषण पाणी टंचाई पहायला मिळत आहे. पालघरच्या ग्रामीण भागातील नागरिकांना (Water Scarcity) हंडाभर पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. तर याच पालघर (Palghar) जिल्ह्यात दुसऱ्या बाजूला मात्र कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे दिवसाला लाखो लिटर पाणी वाया जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. (Maharashtra News)

Palghar News
Water Shortage : मांजरा धरणातील पाणीसाठा अवघा ६ टक्क्यावर; बीडसह लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यावर पाणी संकट गडद

कोकण (Kokan) पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत तलासरीत असलेल्या कुरंझे डॅममधून कालव्यांमार्फत शेतीसाठी पाणी सोडले जाते. मात्र या कालव्यांची आणि कालव्यांमध्ये असलेल्या लोखंडी गेटची दयनीय अवस्था झाली असल्याने या कालव्यांमधून लाखो लिटर पाणी वाया जाऊन त्याची नासाडी होत असल्याच समोर आल आहे. हे पाणी थेट नद्यांमध्ये जाऊन मिळत असल्याने या पाण्याचा कोणताही फायदा येथील शेतकऱ्यांना (Farmer) होताना दिसत नाही. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Palghar News
Gas Cylinder Blast : सिलेंडरच्या स्फोटांने मिरारोड हादरले; एकामागून एक पाच गॅस सिलेंडर ब्लास्ट, कामगारांच्या झोपड्या जाळून खाक

दरम्यान अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या पाण्याच्या नासाडीकडे कोकण पाटबंधारे विकास महामंडळ दुर्लक्ष करत असल्याचे चित्र समोर आलं आहे. त्यामुळे जिल्ह्यात एका बाजूला धरणांमध्ये कमी पाणीसाठा असताना दुसऱ्या बाजूला मात्र अशा पद्धतीने पाणी वाया जात आहे. या सगळ्या परिस्थितीकडे कोकण पाटबंधारे विकास महामंडळ दुर्लक्ष का करतय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com