Arif Shaikh Death Saam TV
मुंबई/पुणे

Arif Shaikh Death : मोठी बातमी! अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा आरिफ भाईजानचा मृत्यू, तुरुंगातच आला हार्ट अटॅक

Arif Shaikh Heart Attack : आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असताना आरिफ भाईजानच्या छातीत अचानक दुखू लागलं होतं.

Satish Daud

अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा आरिफ भाईजान याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असताना आरिफच्या छातीत अचानक दुखू लागलं होतं. पोलिसांनी त्याला उपचारासाठी जे.जे रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचार सुरु असताना त्चा मृत्यू झाला. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मे २०२२ रोजी आरिफला अटक केली होती.

गँगस्टर दाऊद इब्राहिमशीआणि त्याचा सहकारी छोटा शकील यांना मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. एनआयएने दाऊद इब्राहिमशी संबंधित टेरर फंडिंग प्रकरणात आरिफ भाईजानला अटक केली होती. न्यायालयाने त्याची रवानगी तुरुंगात केली होती. तेव्हापासून आरिफ हा आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी आरिफ भाईजानची अचानक तब्येत बिघडली. छातीत दुखू लागल्याने पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना आरिफचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

एकेकाळी आरिफ हा छोटा शकीलच्या सर्व ऑपरेशन्सचा मुख्य होता. २०१६ मध्ये मुंबई क्राइम ब्रँचच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलनं खंडणीच्या आरोपाखाली त्याला अटक केली होती. अरिफसह ९ आरोपींना २००६ मध्ये दुबईतून भारतात पाठवण्यात आलं होतं. त्यांच्यावर २००३ मध्ये गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री हरेन पंड्या यांची हत्या केल्याचा आरोपही होता.

आरिफ शेख, छोटा शकीलच्या आदेशानुसार काम करत होता, दाऊद टोळीसाठी कार्यरत होता. पश्चिम मुंबईतील काही भागात तो सक्रिय होता. आरिफ हा मीरा रोड येथे राहत होता. २०२० मध्ये त्याने छोटा शकीलची बहीण फहमिदासोबत लग्न केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अडकली होती वेश्याव्यवसायात; ६ वर्षानंतर अशी झाली सुटका; भयंकर अनुभव सांगताना म्हणाली...

Chhangur Baba : यूपीतील धर्मांतर करणाऱ्या छांगुर बाबाचे पुणे कनेक्शन; कोट्यवधींची मालमत्ता खरेदी करण्याची होती तयारी

Sawan 2025 Upay: उत्तरेतील श्रावणाचा आज पहिला दिवस; 'हे' उपाय करा भगवान शंकर होतील प्रसन्न

Maharashtra Live News Update : पंढरपूर पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

Rose : जाणून घ्या गुलाबाचे फूल खाण्याचे ५ फायदे

SCROLL FOR NEXT