संजय महाजन, साम टीव्ही प्रतिनिधी
जळगाव : जळगावच्या जामनेरमध्ये ६ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. जळगावमधील या घटनेने परिसरात वातावरण चिघळलं आहे. जामनेरमधील या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. तसेच या संतप्त जमावाने परिसरात जाळपोळ देखील केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे.
जळगावच्या जामनेर पोलीस स्टेशनवर जमावाकडून झाली. या दगडफेकीचे सीसीटीव्ही फुटेज हाती आले आहेत. या घटनेमध्ये जमावातील काही तरुण पोलीस स्टेशनवर तुफान दगडफेक करत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस दगडफेकीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी गेटच्या बाजूने लपलेले दिसत येत आहे.
काही तरुणांनी पोलीस स्टेशनवर तुफान दगडफेक केल्याची सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. सहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीला ताब्यात द्या, आम्हाला त्याला शिक्षा करायची आहे, या मागणीसाठी संतप्त जमावाने रास्ता रोको देखील केला.
दरम्यान, आंदोलन सुरु असताना काही तरुणांनी पोलीस स्टेशनवर दगडफेक देखील केली. तसेच जाळपोळ देखील केली. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी १५ संशयितांना आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, जळगावमधील घटनेवरून ठाकरे गटाने राज्य सरकारवर टीका केली आहे. या घटनेवर ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे म्हणाले, 'महाराष्ट्रात महिलांवरील हिंसेच्या घटना वाढू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी वसईमध्ये एका तरुणीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर जळगावमध्ये 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या झालीये. या वाढत्या घटनांमुळे राज्य सरकार कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.