Husband wife Dispute : बायकोच्या जाचाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या; नाशिकमधील खळबळजनक घटना

Husband ends life in nashik : नाशिकच्या आडगाव परिसरात राहणाऱ्या तरुणाने बायकोच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सासरच्या मंडळीवर गुन्हा नोंदवला आहे.
बायकोच्या जाचाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या; नाशिकमधील खळबळजनक घटना
Husband wife Dispute Saam tv

तबरेज शेख, साम टीव्ही प्रतिनिधी

नाशिक : सासू आणि सासरच्या मंडळीने सूनेला त्रास दिल्याच्या अनेक घटना कानी पडल्या असतील. विवाहित महिलने आत्महत्या केल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, नाशिकमध्ये एका वेगळीच घटना समोर आली आहे. नाशिकच्या आडगाव परिसरात पत्नी, सासू आणि सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने नाशिक आडगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पत्नी आणि सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याचा प्रकार आडगावच्या नगर भागात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर आत्महत्या केलेल्या मुलाच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

बायकोच्या जाचाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या; नाशिकमधील खळबळजनक घटना
Palghar Crime News: चाललंय काय? वसईनंतर विरार हादरलं! जावयाने धारदार शस्त्राने केली सासूची हत्या

तुषार अंतारपूरकर असे आत्महत्या केलेल्या मृताचे नाव आहे. तुषारने आत्महत्येपूर्वी चार पानी चिठ्ठी लिहिली. या चिठ्ठीत त्याने मी पत्नी आणि सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा म्हटलं आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बायकोच्या जाचाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या; नाशिकमधील खळबळजनक घटना
Nashik Crime News: फक्त ५०० रुपयांचा वाद; मित्राने केली मित्राची हत्या

मुलाच्या वडिलांचा आरोप काय?

तुषारचे वडील केशव अंतापूरकर यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीत वडिलांनी म्हटलं की, तुषारचं २००८ साली शीतलसोबत विवाह झाला. पत्नी लग्नानंतर दोन महिन्यातच माहेरी निघून गेली. गेल्या १५ वर्षांपासून ती तिच्या आई-वडिलांच्या घरी आहे.

नवरा मुलगा तिला घरी येण्यासाठी वारंवार विनंती करत होता. सासरे वसंत चव्हाण, सासू शालक यांनी संगनमत करत तुषारचे शारीरिक, मानसिक छळ करायचे. तुषार या छळाला कंटाळला होता. आता आत्महत्या करण्याशिवाय काहीच पर्याय नसल्याचे म्हणत आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहिले आहे. त्यानंतर मंगळवारी दुपारी आत्महत्या केल्याचे वडिलांनी पोलिसांना सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com