Iran-US War: युद्धाच्या सापळ्यात डोनाल्ड ट्रम्पच अडकले? अमेरिकन जनतेला ट्रम्पनं फसवलं?

US Faces Internal Resistance : बलाढ्य अमेरिकेचं या युध्दात पानिपत होणार आहे का ? असा प्रश्न उपस्थित झालाय कारण अमेरिकन सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं केलेल्या एका दाव्यानं. त्यामुळे या युद्धात अमेरिकचं पानीपत होणार की काय असा सवाल उपस्थित झालाय.
US Faces Internal Resistance :
Iran-US Warsaam tv
Published On
Summary
  • व्हिएतनाम युद्धासारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार का

  • ट्रम्प यांच्या युद्ध धोरणावर अमेरिकन जनतेचा विरोध

  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराण युद्ध धोरणावर अमेरिकी जनता आणि लष्कराकडून टीका.

इराण विरोधातील युद्धात आता अमेरिकन जनता आणि अमेरिकन सैनिकच आता ट्रम्प यांना घेरणार का असं चित्र निर्माण झालय. गेल्या २० दिवसांपासून शस्त्र खाली ठेवावीत म्हणून इराणी सैनिकांना घाबरवणारे ट्रम्प स्वत:च मध्य पुर्वेतील युद्धाच्या सापळ्यात अडकल्याचं दुसरं तिसरं कोणी नाही तर अमेरिकेच्या नॅशनल टेररिझम सेंटरचे संचालक जो केंट यांनी म्हटलंय.

भडकलेल्या युद्धात स्वत:च शस्त्र ठेवून त्यांनी राजीनामा देत माघार घेतलीये. जो केंट यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर ट्रम्प यांच्या धोरणाची आंतराष्ट्रीय पातळीवर आणि अमेरिकेत पोलखोल केलीये . त्यांनी आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलं पाहा.

प्रति,

डोनाल्ड जे. ट्रम्प

राष्ट्राध्यक्ष, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका

महोदय,

इराणकडून अमेरिकेला कोणताही तातडीचा धोका नसताना केवळ इस्रायल आणि त्यांच्या शक्तिशाली लॉबीच्या दबावाखाली हे युद्ध लादले गेले आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे २००३ च्या इराक युद्धाप्रमाणे पुन्हा एकदा अमेरिकेची दिशाभूल केली जात असून, हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या 'अमेरिका फर्स्ट' धोरणाचे थेट उल्लंघन आहे. आपल्या सैनिकांच्या रक्ताचा हा नाहक होम असल्याने मी माझ्या पदाचा त्याग करत आहे.

आपला नम्र,

जो केंट

संचालक, नॅशनल काउंटर-टेररिझम सेंटर

US Faces Internal Resistance :
Iran - US War: युद्धाच्या आगीत डोनाल्ड ट्रम्प स्वतःच होरपळले; अमेरिकी प्रशासनात भडका, नेमकं काय घडलं?

उच्चपदस्थ अमेरिकन अधिकाऱ्यानं दिलेल्या या राजीनाम्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये खळबळ माजली. कारण काल पर्यंत गरज नसतांना अमेरिका या युद्धात उतरल्याचं अमेरिकन जनता बोलत असतांना आता थेट ११ वेळा युद्धभूमीवर जाऊन कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यानं,ट्रम्प यांच्या रणनितीचा समाचार घेत त्यांनी अमेरिका फर्स्टच्या नावानं जनतेला कसं गंडवलं हेच समोर आणलं. यानंतर ट्रम्प समर्थ भडकले, स्टिकर्स फाडले.

US Faces Internal Resistance :
मोठी बातमी: यंदा शिया मुस्लिम समाज ईद साजरी करणार नाही! नेमकं कारण काय?

कधीकाळी ट्रम्प यांचे कट्टर समर्थक असलेल्या अनेकांनी युद्धात अमेरिका भरडली गेल्याचं दिसल्यानं आपल्या गाडीवर लावलेले ट्रम्प यांचे पोस्टर्स फाडून फेकून दिले. वाढत्या गॅसच्या किमतींमुळे अमेरिकन जनतेचा राग अनावर झाला. स्ट्रेट ऑफ होर्मुझ अडवल्यानं तेलाचे दर ११७ डॉलर प्रति बॅरल झाले अन् गेल्या 4 वर्षांतील सर्वोच्च पातळी गाठली.

CNN-SSRSच्या ताज्या सर्व्हेनुसार, ५९% अमेरिकन इराणवरील हल्ल्यांच्या विरोधात आहेत तर त्यांची अप्रूवल रेटिंग आता ४४% वर आलीये. ५४% जनतेनं त्यांच्या धोरणांवर उघडउघड नाराजी व्यक्त केलीये. युद्धात देश आपल्या सर्वोच्च नेत्याच्या मागे खंबीरपणे उभा असतो. मात्र ट्रम्प यांच्या बाबतीत उलट घडलंय. त्याला कारण आहे गरज नसतांना जगावर युद्ध लादण्याची ट्रम्प यांची भूमिका.

आजवर जगभरात ट्रम्प यांना विरोध होत असतांना आता अमेरिकन जनता आणि सैनिक त्यांच्या विरोधात भूमिका घेत असतांना इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय असं वाटू लागलंय. ५१ वर्षांनंतर अमेरिका व्हिएतनाम युद्धासारखी इराण युद्धातही तोंडघशी पडणार असल्याचे हे संकेत आहेत का हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com