चिनी लढाऊ विमानांच्या तैवानवर घिरट्या; इराण-अमेरिकेनंतर आता चीन-तैवानमध्ये युद्ध?

china-taiwan war erupts : संपूर्ण जगाचं लक्ष आखातातील युद्धाकडे लागलेलं असताना तैवानच्या शेजारी चीननं आपल्या कुरापती पुन्हा सुरू केल्या आहेत. दक्षिण चीन सुमद्रात नेमकं काय घडतंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
taiwan on alert
china-taiwan war erupts Saam tv
Published On

रोहित कदम, साम टीव्ही

संपूर्ण जगाचं लक्ष मध्य-पूर्वेतील युद्धाकडे लागलेलं असताना उत्तरेत दुसरं युद्ध भडकण्याची शक्यता आहे. चीन आणि तैवान यांच्यात तणाव वाढतोय. चीननं तैवानवर लष्करी दबाव वाढवला असून दक्षिण चीन समुद्रात 26 लढाऊ विमाने आणि 7 युद्धनौका तैनात केल्यात. यातील 16 चीनी लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई संरक्षण ओळख क्षेत्रात प्रवेश केलाय. त्यामुळे प्रत्युत्तरादाखल तैवाननंही आपली लढाऊ विमाने, नौदल जहाजे आणि क्षेपणास्त्र प्रणाली सक्रिय करून चीनला आव्हान दिलंय. संपूर्ण जग आधीच युद्धात भरडलं जात असताना चीननं तैवानच्या हद्दीत लष्करी हालचाली वाढवल्यात. मात्र, तज्ज्ञांनी यास चीनच्या 'ग्रे-झोन युद्ध' धोरणाचा एक भाग म्हटलंय. काय आहे हे चीनचं 'ग्रे-झोन युद्धनीती' धोरणाचं वैशिष्ट्यं पाहूयात...

taiwan on alert
काही महिने युद्ध सुरूच राहणार? इराणचं सरकार ठाम, ट्रम्प यांना फुटला घाम

तैवानच्या शेजारी चिनी हालचालींना ग्रे-झोन युद्धनीती किंवा ग्रे-झोन डावपेच म्हटलं जातं. या धोरणाची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे, हे थेट युद्ध नसून सतत लष्करी दबाव निर्माण केला जातो. तसंच, लष्करी विमाने आणि जहाजांद्वारे नियमित घुसखोरी करून शत्रूच्या सुरक्षा यंत्रणेला सतत सक्रिय राहण्यास भाग पाडणे. सोप्या भाषेत, हे युद्ध आणि शांतता यांच्यातील एक धोरण असून लष्करी शक्तीचे प्रदर्शन केले जाते. मात्र प्रत्यक्ष युद्धाची रेषा ओलांडली जात नाही.

खरंतर, तज्ज्ञांनी चीनच्या 'ग्रे-झोन युद्धनीती'चं विश्लेषण केलं असलं तरी चीनच्या लेखी याचा अर्थ वेगळा असू शकतो.

चीनच्या रणनीतीनुसार, पहिलं म्हणजे वारंवार सतर्कता आणि लष्करी प्रत्युत्तरे शत्रूच्या हवाई दल आणि नौदलावर दबाव निर्माण करू शकतो. दुसरं म्हणजे, अशा कारवायांद्वारे चीन आपला शत्रू किती लवकर प्रतिसाद देतो आणि त्याची लष्करी प्रणाली किती प्रभावी आहे, याची देखील चाचपणी करतोय. तर तिसरं म्हणजे, जर अशा कारवाया वारंवार सुरू राहिल्या, तर शत्रूवर कायमस्वरूपी दबाव निर्माण केला जाऊ शकतो.

taiwan on alert
Iran - US War: युद्धाच्या आगीत डोनाल्ड ट्रम्प स्वतःच होरपळले; अमेरिकी प्रशासनात भडका, नेमकं काय घडलं?

महत्त्वाचं म्हणजे, चीननं 2020 पासून तैवानच्या प्रदेशाजवळ लष्करी उड्डाणे आणि नौदल गस्त लक्षणीयरीत्या वाढवलीये. तसंच, तैवानची सामुद्रधुनी जगातील सर्वात संवेदनशील सागरी प्रदेशांपैकी एक असल्याने चीनच्या हालचाली त्यांच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे. एव्हढंच नाही तर चीन 'ग्रे-झोन युद्धनीतीच्या नावाखाली तैवानवर झडप घालण्याची संधी शोधत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तिकडे अमेरिका युध्दात आधीच अडकलेला असतानाच आता चीनची खुमखुमी जगाला आणखी एका युद्धाच्या खाईत लोटणार का, याकडे जगाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com