वैदेही कानेकर, मुंबई
Uddhav Thackeray Speech: शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मुंबईच्या विलेपार्ले पूर्व येथे नव्या वाटा नवी संधी उज्वल भविष्यासाठी साथ शिवसेनेची महा नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन राजाचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले यावेळी 140 नामांकित कंपन्यांनी येथे रोजगार उपलब्ध करून दिले यात मुलाखतीनंतर पात्र ठरलेल्या तरुणांना जागेवरच नियुक्तीपत्र देण्यात आले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
"हा एक समाधानाचा क्षण आहे. बाळासाहेब यांनी मराठी माणसासाठी नोकऱ्यांच्या संधी सुरु केल्या. नोकऱ्या देणारे बना! असे बाळासाहेब म्हणायचे. आज दंगली भडकण्याचा राजकारण सुरु आहे. हिंदू मुस्लिम भांडण लावायचे. मग तरुणांचे काय त्यांच्या कामाचे काय? मोदी हजारो कोटी रुपयांचे प्रकल्पांचे भूमिपूजन करतात. आदित्यने पत्रकार परिषद सांगितलं शिव स्मारकाचे भूमिपूजन होऊन किती वर्ष झालं त्या कामाचं काय झालं? या प्रकल्पामध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे घर भरले जातात," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
"आमचे हिंदुत्व घरातली चूल पेटवणार हिंदुत्व आहे आणि त्यांचं हिंदुत्व हे घर पेटवणार आहे तत्व आहे. मराठी माणसाला नोकरीसाठी नो एन्ट्री अशा प्रकारचे बोर्ड लागले होते, असे सगळे बोर्ड फोडून टाका. स्थानिकाला मराठी माणसाला महाराष्ट्रात . नोकरी मिळायलाच पाहिजे. माझं सरकार पाडल्यानंतर एक तरी प्रकल्प मोठा सांगा जो महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रात अस्थिरता दिसली आणि प्रकल्प आलेच नाहीत," असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.
"मोदीजी तुम्ही येत आहात जेवढा फिता कापायच्या त्या कापून घ्या. विधानसभेत आमचं सरकार आल्यानंतर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. लोकसंख्या वाढते पण रोजगार कोणीच देत नाहीय. मुलगी शिकली प्रगती झाली पंधराशे देऊन घरी बसवली असं आम्ही करत नाही. आता लवकरच काही लोक बेरोजगार होणार आहेत त्या गद्दारांना रोजगार मिळणार नाही, यांनी केलेल्या घोटाळ्यांचा आमचं सरकार आल्यानंतर हिशोब होणार आहे," असा थेट इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.