Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचा प्रचाराचा नारळ फुटला, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये

Shiv Sena Uddhav Thackeray Group : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाच थीम साँग आणि गोंधळ गीत आज रिलीज करण्यात आलं. या गीताच्या माध्यमातून नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी प्रचाराचा नारळ फोडला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam Digital
Published On

विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. त्यापार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दसरा सण शिवसेनेसाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी नेहमी भावनिक विषय राहिला आहे. त्याचं औचित्य साधून ठाकरे गटाने आज थीम साँग आणि गोंधळ गीत रिलीज केलं. पितृपक्ष संपताच उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये असून या गीताच्या माध्यमातून नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे.

दहा दिवस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांची दुपारी 1 वाजता शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली.आजपासून नवरात्री सुरू होत आहे. मात्र परंपरेप्रमाणे दसऱ्याला शिवाजीपार्कवर शिवसैनिकांना भेटणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

आता जगदंबेच्या उत्सव असून जे माजले आहेत, त्यांचा वध करणाऱ्या महिषासुरमर्दिनीचा सण आहे. सध्या राज्यात तोतयागिरी चालली आहे. अनेक संतांनी गोंधळ गीतातून लोकांमध्ये जागर पोचवला. पण आजकाल 'एकनाथां'च्या नावाने तोतयागिरी करणारे पण आहेत. पण आज हे राजकीय नसलेले गीत रिलीज करत असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

Uddhav Thackeray
Mumbai Air Pollution : मुंबईची हवा पुन्हा बिघडली, 24 तासांत PM2.5 पातळी 50% पेक्षा वाढली,नक्की काय आहे कारण?

विधानसभेच्या पार्श्वभूमीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने गीत तयार केले होते. आता या पक्षांच्या पाठोपाठ ठाकरे गटानेही नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी 'असुरांचा संहार करायला मशाल हाती दे...' हे गीत लाॅन्च केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे गीत लाॅन्च करण्यात आले.

न्यायासाठी गेली दोन अडीच वर्ष न्यायालयात दाद मागत आहे. मात्र आता न्यायालयाचं दार ठोठावून हात दुखत आहेत. त्यामुळे शेवटी जगदंबेलाच साकडं घातलं पाहिजे, आता तु तरी दार उघड. राज्यात देशात महिलांवर अत्याचार होत आहेत. मनापासून हाक मारली की भक्तांच्या हाकेला आई धावून येते, याची मला खात्री आहे, असं उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. आता न्यायाची लढाई जनतेच्या दरबारात सुरु झाली आहे. आपली आपुलकी आणि माया आमच्यावर असुद्या. सध्या राज्यात देशात जी अराजकता माजली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा समाचार  दसरा मेळाव्यात घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray
Israel Iran War : इराण की इस्रायल कोण पडणार युद्धात भारी? कोणाची किती ताकद? वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com