Uddhav Thackeray On Ram Mandir Saam Tv
मुंबई/पुणे

Ram Mandir: मी राम मंदिरात गेल्यानंतर मंदिराचा निकाल लागला: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray On Ram Mandir: ''राम मंदिर विषय थंड बसत्यात होता. मी राम मंदिरात गेल्यानंतर मंदिराचा निकाल लागला. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर मंदिर झालं आहे'', असं उद्धव ठाकरे म्हणाल आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Uddhav Thackeray On Ram Mandir:

''राम मंदिर विषय थंड बसत्यात होता. मी राम मंदिरात गेल्यानंतर मंदिराचा निकाल लागला. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर मंदिर झालं आहे'', असं उद्धव ठाकरे म्हणाल आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण- डोंबिवली मतदार संघाचा आज उद्धव ठाकरे यांनी दौरा केला आहे. यावेळी डोंबिवलीत बोलताना ते असं म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, सर्व देशभक्त एकत्र झालेत. सर्व पक्ष आज एकत्र आलेत. आपलं हिंदुत्व बेंगडी नाही. आपण हिंदुत्व सोडू शकत नाही. ते म्हणाले, अटल सेतूवर काल एकटेच फिरत होते. काल बॅनरवर देखील अटलजीचा फोटो नव्हता. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभा जिंकल्या सारखं वातावरण आहे. व्यंगचित्रकराचा मुलगा आहे, कधी चित्र कसं आहे, हे माहित आहे. नुसतं शाखेत आलोय तर एवढी गर्दी आहे. आता लोकशाहीचा युद्ध सुरू झालं आहे. हिम्मत असेल तर ज्यांनी निर्णय दिलाय त्यांनी जनतेत जाऊन विचार, हिम्मत असेल तर, असं नाव न घेता राहुल नार्वेकर यांना त्यांनी लक्ष्य केलं आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील निकालानंतर उद्धव ठाकरे हे आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी निर्णय आल्यानंतर ते म्हणाले होते की, ''न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत? काय चौकट दिलेली आहे? त्या चौकटीच्या अंतर्गत काय निर्णय घ्यायला पाहिजे? अथवा काय चौकशी करायला पाहिजे? हे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते. ते संपूर्णपणे पायदळी तुडवले. आमच्या मागे महाशक्ती आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा जुमानत नाही, हे आजच्या त्यांच्या (राहुल नार्वेकर) निकालातून दिसून आलं आहे.''

ते म्हणाले होते की, ''त्यांनी (राहुल नार्वेकर) स्वतः दोन-तीन पक्ष बदलली आहेत. यामुळे त्यांनी आज त्यांच्या भावी वाटचालतील अडथळा आज दूर करून घेतला असेल. आज पर्यंत आपण जे मनात आलो आहोत की, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल अथवा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश हे सर्वोच्च असतात, ते एक परिमाण ठरलं जातं.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2025 Mega Auction: ५७७ पैकी १८२ खेळाडू झाले मालामाल! पाहा सर्व १० संघांची संपूर्ण यादी

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्या दिशेला काय असावे? वाचा

IQ Test: 'या' फोटोमध्ये लपलेली बाटली शोधा; तुमच्याकडे आहेत केवळ ८ सेकंद

Jalgaon News : पादचारी तरुणाला वाहनाची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री होऊ नये - रामदास आठवले

SCROLL FOR NEXT