मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वाचा निकाल देताना म्हटले आहे की, एका महिलेने तिच्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणे म्हणजे मानसिक क्रूरता आहे. हिंदू विवाह कायद्यांतर्गत घटस्फोट घेण्यास त्याचं (पती) हे एक वैध कारण आहे. सुदीप्तो साहा आणि मौमिता साहा यांच्याशी संबंधित खटल्यात न्यायालयाने 3 जानेवारीला हा आदेश दिला. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिलं आहे.
इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती शील नागू आणि न्यायमूर्ती विनय सराफ यांच्या खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाचा २०१४ चा निर्णय बाजूला ठेवला. ज्यामध्ये सुदिप्तो याने केलेली घटस्फोटाची याचिका न्यायालयाने फेटाळली होती. निकाल देताना उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, "शारीरिक जवळीक नाकारणे म्हणजे मानसिक क्रूरता आहे." (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सुदिप्तोने दाखल केलेल्या याचिकेनुसार, त्याने मौमितासोबत घटस्फोटाची मागणी केली होती. 12 जुलै 2006 रोजी लग्नाच्या दिवसापासून ते 28 जुलै 2006 रोजी त्याने भारत भारताबाहेर जाण्यापर्यंत सतत शारीरिक संबंधास नकार देऊन मौमिताने लग्न संपन्न होऊ दिलं नाही. (Latest Marathi News)
सुदिप्तोच्या म्हणण्यानुसार, मौमिताने त्याला सांगितले की, तिच्या पालकांनी तिला हे लग्न करण्यास भाग पाडले आणि तिने सुदिप्तोसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला, कारण तिचा आधीच एक बॉयफ्रेंड आहे.
याचिकेनुसार, पश्चिम बंगालमध्ये लग्न झाल्यानंतर तिने सुदीप्तोला तिला आपल्या प्रियकराकडे सोडावं, असं म्हटलं होतं. तसेच भोपाळ येथील घरी पोहोचल्यानंतरही तिने त्याशी आपले लग्न संबंध मानण्यास नकार दिला. सुदिप्तोने सांगितले की, मौमिताने सप्टेंबर 2006 मध्ये भोपाळमधील त्याचे घर सोडले आणि पुन्हा ती परतलीच नाही.
त्याने आरोप केला की, त्याच्या विभक्त पत्नीने 2013 मध्ये त्याच्या आणि त्याच्या पालकांविरुद्ध खोटी तक्रार देखील दाखल केली होती. तिने आरोप केले होते की हुंड्यासाठी सुदिप्तो आणि त्याच्या कुटुंबीयायनी तिचा छळ केला. तसेच सुदिप्तो आणि त्याच्या कुटुंबीयांनी साडीने गळा आवळून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील मौमिताने केला. त्यामुळे सुदीप्तोच्या पालकांनी तब्बल 23 दिवस कोठडीत काढावे लागले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.