FDA Commissioner Tukaram Mundhe announces strict MCOCA action against illegal gutkha networks across Maharashtra. saam tv
मुंबई/पुणे

तुकाराम मुंढेंचं धडाडीचं पाऊल; गुटखा उत्पादक, वाहतूकदार अन् पुरवठादारावर थेट मकोका; धाबे दणाणले

MCOCA Action Against Gutkha Mafia In Maharashtra: महाराष्ट्रात गुटखा माफियांवर मोठी कारवाई करण्यात येणार आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उत्पादक, पुरवठादार आणि वाहतूकदारांवर मकोका अंतर्गत कारवाईचे आदेश दिले.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

राज्यात प्रतिबंधित गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध व्यापाराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठे पाऊल उचलले आहे. संघटित पद्धतीने हा व्यवसाय करणाऱ्या टोळ्या, नेटवर्क आणि संबंधित साखळीतील सर्व घटकांवर आता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे आदेश FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणासाठी आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जारी केलेल्या आदेशानुसार केवळ किरकोळ विक्रेत्यांवर नव्हे, तर उत्पादक, पुरवठादार, वाहतूकदार, गोदाम चालक, घाऊक विक्रेते आणि संपूर्ण वितरण साखळीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुटखा आणि निकोटीनयुक्त पानमसाल्यावर आधीपासूनच बंदी आहे. मात्र बनावट कागदपत्रे, बेनामी व्यवहार, गुप्त गोदामे आणि आंतरराज्य पुरवठा साखळीच्या माध्यमातून हा व्यापार सुरू असल्याचे अनेक तपासांतून समोर आले आहे. त्यामुळे अशा प्रकरणांकडे आता केवळ अन्नसुरक्षा उल्लंघन म्हणून नव्हे, तर संघटित गुन्हेगारी म्हणून पाहिले जाणार आहे.

मकोका लागू झालेल्या प्रकरणांमध्ये आरोपींना जामीन मिळवण्यासाठी कठोर दुहेरी अटींचा सामना करावा लागणार आहे. तसेच सरकारी अभियोक्ता, पोलीस आणि FDA यांच्यात समन्वय ठेवून जामिनाला प्रभावी विरोध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, "सार्वजनिक आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर आता मकोका अंतर्गत कारवाई होईल. कायद्याचे पालन करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा उद्देश नाही. मात्र संघटितपणे प्रतिबंधित अन्नपदार्थांचा व्यापार करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि नेटवर्कविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.

याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात मकोका पात्रता, एफआयआर, आरोपपत्रे आणि जप्ती कारवाईची स्वतंत्र नोंदवही ठेवली जाणार असून सह आयुक्त स्तरावर दरमहा त्याचा आढावा घेतला जाणार आहे. FDA च्या या निर्णयामुळे राज्यातील गुटखा माफिया आणि अवैध तंबाखू व्यापार करणाऱ्या संघटित टोळ्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT