Shocking: पुण्यातील आयटी इंजिनिअरची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिली कंपनीतील दोन महिलांची नावं, परिसरात खळबळ

IT Engineer Killed Himself: पुण्यातील हिंजवडी येथील ४८ वर्षीय आयटी इंजिनिअरनं आत्महत्या केली आहे. दोन पानांच्या सुसाईड नोटमध्ये दोन सिनिअर महिला सहकाऱ्यांची नावे लिहिली आहेत. त्यात मानसिक छळाचे आरोप करण्यात आले आहेत.
SHOCKING PUNE CASE: IT ENGINEER ENDS LIFE, NAMES TWO WOMEN COLLEAGUES IN SUICIDE NOTE
SHOCKING PUNE CASE: IT ENGINEER ENDS LIFE, NAMES TWO WOMEN COLLEAGUES IN SUICIDE NOTEsaam tv
Published On
Summary
  • हिंजवडीतील ४८ वर्षीय आयटी अभियंतानं आत्महत्या केली आहे.

  • दोन पानांच्या सुसाईड नोटमध्ये काही व्यक्तींवर गंभीर आरोप केलेत.

  • या घटनेमुळे आयटी क्षेत्रातील मानसिक ताण आणि ऑफिसमध्ये होणाऱ्या छळाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय.

पुण्याच्या आयटी हब असलेल्या हिंजवडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 48 वर्षीय आयटी इंजिनिअरनं आत्महत्या केली आहे. वरिष्ठ महिला सहकाऱ्यांकडून होणारा कथित मानसिक छळ आणि मित्राकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अमित ब्राम्हे असं या अभियंत्याचं नाव आहे. याप्रकरणी नामांकित आयटी कंपनीतील दोन वरिष्ठ महिला कर्मचाऱ्यांसह एका मित्राविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

SHOCKING PUNE CASE: IT ENGINEER ENDS LIFE, NAMES TWO WOMEN COLLEAGUES IN SUICIDE NOTE
मुख्याध्यापकानं आधी दोन मुलं,पत्नीला मारलं नंतर स्वतः केली आत्महत्या; सोलापुरातील धक्कादायक घटना

ही घटना २ जून रोजी घडली असून ४८ वर्षीय आयटी अभियंता अमित ब्राम्हे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं. आत्महत्येपूर्वी अमित यांनी दोन पानांची सुसाईड नोट लिहिली होती. यात त्यांनी कंपनीत छळ होत असल्याची बाब समोर आली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांची नावे स्पष्टपणे लिहिली आहेत. अमित ब्राम्हे यांनी लिहिलेल्या नोटमध्ये कंपनीतील वरिष्ठ सहकारी अर्चना आणि शाश्वती यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

SHOCKING PUNE CASE: IT ENGINEER ENDS LIFE, NAMES TWO WOMEN COLLEAGUES IN SUICIDE NOTE
Mumbai : मुंबईत ATS ची मोठी कारवाई! २ कोटींचे ड्रग्स जप्त; दोघांना बेड्या

कामाच्या ठिकाणी त्यांचा मानसिक छळ कसा होत होता हे सांगितलं. चांगले प्रोजेक्ट्स काढून घेणे, जाणूनबुजून अत्यंत कठीण कामे देणे, इतर स्टाफसमोर वारंवार अपमान करणे. नोकरी सोडण्यासाठी सातत्याने दबाव टाकणे, असा छळ होत असल्याचं त्यांनी आपल्या नोटमध्ये म्हटलंय. दोन्ही महिला सहकाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप अमित यांनी केला आहे.

SHOCKING PUNE CASE: IT ENGINEER ENDS LIFE, NAMES TWO WOMEN COLLEAGUES IN SUICIDE NOTE
Nashik News : सासरचा छळ असह्य झाला, २५ वर्षीय महिलेनं आयुष्य संपवलं; पती, सासू-सासऱ्यावर गुन्हा

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

दोन महिला कर्मचाऱ्यांशिवाय त्यांचा मित्र विनोद पालीचा देखील उल्लेख असून त्यानेही त्रास दिल्याचं म्हटलं आहे. विनोदने अमित यांच्या विरोधात खोट्या तक्रारी केल्या आणि कंपनीत त्यांची बदनामी केल्याच म्हटलंय. या सततच्या त्रासाला आणि अपमानाला कंटाळूनच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचं अमित यांनी चिठ्ठीत म्हटलंय. अमित ब्राम्हे यांच्या सुसाईड नोटच्या आधारे भोसरी पोलिसांनी तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com