Nashik News : सासरचा छळ असह्य झाला, २५ वर्षीय महिलेनं आयुष्य संपवलं; पती, सासू-सासऱ्यावर गुन्हा

25 year old married woman ends life in yeola : सासरचा छळ असह्य झाल्यानं एका २५ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. नाशिकच्या येवला तालुक्यातील वाघाळे येथे ही दुर्दैवी घटना घडली.
हुंड्यासाठी छळ, वैतागलेल्या विवाहित तरुणीची शेततळ्यात उडी मारून आत्महत्या, येवला तालुक्यातील घटना
yevala Taluka Women vaishali navle ends lifesaam tv
Published On

अजय सोनावणे, नाशिक | साम टीव्ही

वैशाली नवले. वय वर्ष अवघे २५. तीन वर्षांपूर्वी लग्न झालं. सुखी संसाराची स्वप्ने रंगवली. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने आनंदात गेले. तिच्या सुखी संसाराला हुंडारुपी वाळवीची नजर लागली. शेतीची कामे आणि कार खरेदीसाठी सुरू झाला अगणित, असह्य छळ. साताजन्माची साथ देणारा पती आणि सासू, सासऱ्यांनी पैशांसाठी मानसिक आणि शारिरीक छळ सुरू केला. सततचा त्रास आणि नेहमीचीच शिवीगाळ. अखेर वैतागून २५ वर्षांच्या विवाहितेनं जीवनयात्रा संपवली. शेततळ्यात उडी मारून तिनं आत्महत्या केली. या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नाशिकच्या येवला तालुक्यात वाघाळे येथे ही दुर्दैवी घटना घडली. हुंड्यासाठी सासरच्यांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहित महिला वैशाली नवले हिने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात तिचा पती, सासरा आणि सासू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारचाकीसाठी ३ लाखांची मागणी

वैशालीचे वडील शरद रामचंद्र निकुळे यांनी येवला तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, वैशालीचा विवाह जून २०२३ मध्ये नामदेव नवले याच्याशी झाला. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने तिचा संसार आनंदानं सुरू होता. पण त्यानंतर हुंड्यासाठी तिचा छळ सुरू झाला. शेतीचं काम आणि चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी वडिलांकडून ३ लाख रुपये घेऊन ये असा तगादा सासरच्यांनी तिच्यामागे लावला.

वैशालीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पैशांसाठी पती नामदेव, सासरा आणि सासू यांनी तिचा शारिरीक आणि मानसिक छळ केला. त्यांच्याकडून सतत तिला त्रास दिला जात होता. शिवीगाळ केली जायची. अखेर या सर्व त्रासाला वैतागून वैशालीनं घरासमोरच्या शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली.

या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून येवला तालुका पोलीस ठाण्यात वैशालीचा पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

हुंड्यासाठी छळ, वैतागलेल्या विवाहित तरुणीची शेततळ्यात उडी मारून आत्महत्या, येवला तालुक्यातील घटना
Gadchiroli news : नगरपंचायत अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; जिल्हा परिषद माजी अध्यक्षासह चौघांवर गुन्हा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com