Baroda JNPT Highway Saam Tv News
मुंबई/पुणे

Fraud Case: आदिवासींचे ७४ लाख रुपये लाटल्याचा आरोप; शिवसेनेचे सुरेश टोकरे, राष्ट्रवादीचे भगवान चंचे यांना अटक

Baroda JNPT Highway: बडोदा जेएनपीटी महामार्गाच्या भूसंपादनात आदिवासींची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी महायुतीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल केलाय.

Bhagyashree Kamble

मयुरेश कडव, प्रतिनिधी | साम टीव्ही

बडोदा जेएनपीटी महामार्गाच्या भूसंपादनात आदिवासींची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी आरोपींवर कारवाई करत ४ जणांवर गुन्हा दाखल केलाय. यामध्ये शिवसेना शिंदे गटात असलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले नेरळचे माजी सरपंच भगवान चंचे यांचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे.

बदलापूरच्या ग्रामीण भागातून जाणाऱ्या बडोदा जेएनपीटी महामार्गासाठी काही वर्षांपूर्वी भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली होती. या भूसंपादनात १० आदिवासी जागामालकांच्या बँक खात्यात आलेले ७४ लाख ५० हजार रुपये या आरोपींनी परस्पर स्वतःच्या आणि निकटवर्तीयांच्या खात्यात वळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

प्रकरण उघडकीस आल्यानंतर बदलापूर ग्रामीण पोलिसांनी आरोपींवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान चंचे, संजय गिरी आणि समीर वेहळे या चौघांना अटक करण्यात आली आहे. तसेच आणखी ५,६ आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी एपीआय गोविंद पाटील यांनी दिली आहे.

या फसवणूक प्रकरणात थेट सत्ताधारी पक्षात असलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि माजी सरपंचांनाच अटक झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये काही तत्कालीन सरकारी अधिकार्‍यांचाही सहभाग होता का? याचा देखील तपास पोलीस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदारसंघात एसीबीची मोठी कारवाई

बजेटआधीच तिजोरीत खडखडाट; फुकट्या योजनांमुळे राज्य अडचणीत, VIDEO

पैठणची गोदावरी झाली सोन्याची खाण;टोपल्या-चाळण्या घेऊन कुटुंब नदीत, VIDEO

Wednesday Horoscope: पैशाचे व्यवहार टाळा; ५ राशींच्या व्यक्तींसाठी प्रियकराकडून मिळेल खास भेट; वाचा राशीभविष्य

Pollution Alarm: पुणेकरांच्या फुफ्फुसात विषारी धूळ; हवेत दर तासाला मिसळलं जातंय 6 टन सिमेंट

SCROLL FOR NEXT