Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : प्रवाशांसाठी खुशखबर! 'मेट्रो ९' मार्गिकेच्या कामाला सुरुवात होणार, कुठून कुठे धावणार?

Mira - Bhayandar Metro News : मीरा–भाईंदर ते दहिसर–काशीमिरा मेट्रो डिसेंबर अखेर सुरू होणार असून प्रवाशांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. अंधेरी व कुलाबा येथे थेट मेट्रोने पोहोचण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

Alisha Khedekar

  • दहिसर–काशीमिरा मेट्रो डिसेंबरमध्ये सुरू होणार

  • मीरा–भाईंदर रहिवाशांची १४ वर्षांची प्रतीक्षा संपणार

  • मेट्रोमुळे अंधेरी, एअरपोर्ट आणि कुलाबा येथे थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल

  • 2026 पर्यंत प्रकल्प नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत विस्तारला जाणार आहे

पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मिरा- भाईंदरमध्ये लवकरच मेट्रो सेवा सुरु होणार असल्याची सरकारने घोषणा केली आहे. या प्रकल्पामुळे वाढती लोकसंख्या, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वाढणारा वेळ या सर्व संकटातून प्रवाशांची सुटका होणार आहे. तब्बल १४ वर्षांच्या पाठपुराव्याला यश येत असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

या वर्षीच्या डिसेंबर अखेर दहिसर ते काशीमिरा मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन असून मिरा-भाईंदरवासियांसाठी हा एक आनंदाचा क्षण असणार आहे. तब्बल १४ वर्षाच्या पाठपुराव्याला यश येत असून मिरा-भाईंदरवासियांचे स्वप्न पूर्णत्वास येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.परिवहन मंत्री सरनाईक यांनी दहिसर ते काशीमिरा या मेट्रो मार्गाचा पाहणी दौरा केला, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या सोबत ‘महामेट्रो’ चे अधीक्षक अभियंता व त्यांची तंत्रज्ञ सल्लागार कंत्राटदार टीम उपस्थित होती.

मंत्री सरनाईक ( Pratap Sirnaik ) म्हणाले की, "सन २००९ मध्ये जेव्हा या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो, त्यावेळी येथील नागरिकांना मेट्रोचे स्वप्न दाखवले होते. गेल्या १४ वर्षांमध्ये सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश येताना दिसत आहे. २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे दहिसर ते काशीमिरा या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. लवकरच हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा-भाईंदरवासीय मेट्रोने अंधेरीपर्यंत जाऊ शकतील. तसेच तेथून मेट्रो-1 चा वापर करून एअरपोर्ट स्थानक-3 मधून थेट कुलाब्यापर्यंत देखील जाऊ शकतील.त्याचबरोबर, नवीन वर्षात मिरा-भाईंदरवासीयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक मंत्रालय, विधान भवन येथे जाण्यासाठी मेट्रोची नेटवर्कद्वारे सुविधा उपलब्ध असणार आहे."

डिसेंबर -२०२६ अखेर मेट्रो सुभाषचंद्र बोस मैदानापर्यत..

दहिसर - काशीमिरा मेट्रो डिसेंबर-२०२६ पर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत विस्तारित होणार आहे. त्याबरोबरच वसई - विरार मेट्रो ( vasai virar metro ) लाईनचे काम देखील लवकरच सुरू करण्यात येईल. त्यामुळे वसई - विरारपासून अंधेरी आणि तिथून विमानतळ स्थानक इंटरचेंजने थेट कुलाब्यापर्यंत मेट्रोची सेवा पुढील काही वर्षांमध्ये सुरू होऊ शकते, अशी आशा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केली.

दहिसर – काशीमिरा मेट्रोला हिरवा कंदील

दहिसर ते काशीमिरा या नव्या मेट्रो मार्गाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे (सीएमआरएस) प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. ते मिळाल्यानंतर डिसेंबर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या नवीन मेट्रो मार्गाचे लोकार्पण करण्याचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जालनामध्ये 45 वर्षीय व्यक्तीवर तलवारीने हल्ला करून हत्या

Leopard Spotted In Ashti Taluka: बीड जिल्ह्यात बिबट्याचा मुक्त वावर; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

Mumbai Mantralaya News : मोठी बातमी! मंत्रालयात तरुणाचा गोंधळ, नेमकं काय घडलं?

Aloo Chop Recipe : बटाट्याला द्या तडका अन् बनवा खमंग आलू चाप, संडे स्पेशल नाश्ता

Winter Care: हिवाळ्यात सकाळी सूर्यप्रकाश घेतल्याने कोणते फायदे मिळतात? एकदा जाणून घ्या

SCROLL FOR NEXT