Student Harassment : धक्कादायक! पाणी आणायला उशीर झाला, शिक्षकाकडून बेदम मारहाण, विद्यार्थ्यांनी घाबरून जंगलात पळ काढला

Palghar Jawhar News : जव्हार येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाच्या छळामुळे विद्यार्थी जंगलात पळाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांना पाणी आणण्यास उशीर झाल्याचे कारण देत मारहाण करण्यात आली. पालक आणि ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी केली आहे.
Student Harassment : धक्कादायक! पाणी आणायला उशीर झाला, शिक्षकाकडून बेदम मारहाण, विद्यार्थ्यांनी घाबरून जंगलात पळ काढला
Palghar NewsSaam Tv
Published On
Summary
  • जव्हार ZP शाळेत शिक्षकाच्या छळामुळे विद्यार्थ्यांनी जंगलात पळ काढल्याची धक्कादायक घटना

  • पाणी उशिरा आणल्याच्या कारणावरून बेदम मारहाण केल्याचा पालकांचा आरोप

  • उपसरपंच सुभाष भोरे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विभागाकडे तक्रार

  • कारवाई अजून न झाल्याने पालक आणि गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

फय्याज शेख, पालघर

अलीकडेच विरार येथे शिक्षिकेने १० मिनिटं उशिरा आल्याने विद्यार्थिनीला उठाबशा काढायला लावल्या. या दरम्यान या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच पालघर जिल्ह्यातील जव्हार मधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या छळाला कंटाळून विद्यार्थ्यांनी जंगलात धूम ठोकली. या घटनेने पालकवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा जांभूळमाथा येथे एका शिक्षकाने विद्यार्थ्यांवर निर्माण केलेल्या भीतीच्या वातावरणामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शाळा म्हणजे मुलांचं भविष्य घडवण्याचं ठिकाण पण येथे तर शिक्षकाच्या मनमानीमुळे विद्यार्थी शाळेऐवजी जंगलात लपून बसू लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने पालकांसोबतच येथील उपसरपंच सुभाष भोरे आक्रमक होत. जव्हार पंचायत समितीच्या गट विकास तसेच गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा घेतले असल्याचे भोरे यांनी सांगितले.

Student Harassment : धक्कादायक! पाणी आणायला उशीर झाला, शिक्षकाकडून बेदम मारहाण, विद्यार्थ्यांनी घाबरून जंगलात पळ काढला
Winter Alert : महाराष्ट्र गारठला! तापमानाचा पारा १० अंशाखाली, मुंबई- पुण्यासह १५ जिल्ह्यात नागरिकांना भरली हुडहुडी

शिक्षक लोकनाथ जाधव यांनी विवेक बिपिन भोरे, साईनाथ मोरघा, स्वप्निल मोरघा, चेतन , प्रमोद असे अनेक विद्यार्थ्यांना १ किलोमीटर लांब असलेल्या झऱ्यावर पाणी भरायला पाठवले. दूर अंतर असल्याने ह्या विद्यार्थ्यांना पाणी आणण्यात उशीर झाला. हे निमित्त घेत या शिक्षकाने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. हे चित्र पाहताच उर्वरित विद्यार्थी आपला जीव वाचवत मारहाणी पासून बचाव करण्यासाठी जंगलात लपून बसले. ही बाब पालकांना समजताच पालकांन मध्ये संतापाची लाट उसळली. येथील उपसरपंच सुभाष भोरे यांनी गावकऱ्यांना घेत थेट पंचायत समितीच्या प्रशासकीय विभाग गाठले व लेखी तक्रार गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना दिले. मात्र त्या शिक्षकावर अद्याप कोणतेही कारवाई झालेली नाही. यामुळे विद्यार्थ्यी भयभीत झाले आहे.

Student Harassment : धक्कादायक! पाणी आणायला उशीर झाला, शिक्षकाकडून बेदम मारहाण, विद्यार्थ्यांनी घाबरून जंगलात पळ काढला
Shocking : पुणे हादरले! वीट आणि दांडक्याने मारहाण करत महिलेची हत्या, ३ दिवस घरातच ठेवला मृतदेह

शाळेत १ ली ते ८ वी पर्यंत तुकड्या असून येथील पट संख्या ही ९६ आहे. शाळेची नियमित वेळ ही १०:३० पण शिक्षक महोदय ११:१५–११:३० ला हजेरी लावतात, असा पालकांचा आरोप, होत असून निवेदनात तसे नमूद करण्यात आले आहे. अशी परिस्थिती असताना देखील गावकऱ्यांमध्ये एकाच प्रश्नाची चर्चा आहे की, “या शिक्षकाच्या पाठीशी कोण? एवढा उर्मटपणा कोणामुळे?” यांना वरदहस्त कुणाचा? असे नाना प्रश्न गावकऱ्यांना पडत आहेत. अखेर या तक्रारींची दखल घेत ढाढरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष भोरे यांनी स्वतः पुढाकार घेतला .ग्रामपंचायत कमिटी, पालक आणि विद्यार्थ्यांची संयुक्त बैठक घेत भोरे यांनी शिक्षण विभागाला थेट सवाल करत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com