Mystery Death at Kopar Saam
मुंबई/पुणे

डोंबिवलीत रेल्वे रूळावर भयंकर घडलं, भरधाव एक्सप्रेससमोर उडी मारून तरूणानं आयुष्य संपवलं

Mystery Death at Kopar: कोपर रेल्वे स्थानकावर एका अज्ञात व्यक्तीनं भरधाव एक्स्प्रेससमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. तरूणानं आत्महत्या का केली? शोध सुरू.

Bhagyashree Kamble

  • कोपर रेल्वे स्थानकावर तरूणानं उचललं मोठं पाऊल.

  • भरधाव एक्स्प्रेससमोर उडी मारून तरूणाची आत्महत्या.

  • पोलिसांकडून अधिक तपास सुरू.

डोंबिवलीजवळील कोपर रेल्वे स्थानकावरून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका अज्ञात व्यक्तीनं भरधाव एक्सप्रेससमोर उडी मारून आयुष्य संपवलं आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे रेल्वे वाहतूक काही काळासाठी रखडली होती. मात्र, त्यानंतर सुरळीत झाली. धडकेमुळे तो व्यक्ती काही फूट दूर फेकला गेला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनीही त्याला मृत घोषित केले. त्या व्यक्तीनं आत्महत्या का केली? भरधाव एक्सप्रेससमोर उडी घेण्यामागचं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

(जीआरपी) अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोपर रेल्वे स्थानकावर तो व्यक्ती काही वेळ प्लॅटफॉर्मवर इकडे - तिकडे फिरताना दिसला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तो शांत दिसत होता. त्याच्याकडे बॅग होती. अचानक तो प्लॅटफॉर्मवरून खाली उतरला. स्टेशनच्या पूर्वेच्या दिशेनं चालू लागला. कल्याणहून एक भरधाव एक्स्प्रेस आली. एक्स्प्रेस ट्रेन येताच त्यानं रेल्वे रूळावर उडी मारली'.

'ही घटना आत्महत्याचं असल्याचं दिसून येत आहे. पुढील तपासात नेमके कारण समोर येईल', असं अधिकारी म्हणाले. भरधाव एक्स्प्रेस कोपर रेल्वे स्थानकावर दाखल होताच त्या व्यक्तीनं उडी घेतल्यामुळे तो दूरवर फेकला गेला. तो थेट रेल्वे रूळावर पडला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) कर्मचाऱ्यांनी आणि कर्तव्यावर असलेल्या कमांडोंनी जीआरपीला माहिती दिली.

जीआरपीनं घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह रूग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून त्या व्यक्तीला मृत घोषित केले. जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'मृत व्यक्तीचे वय सुमारे ३५ वर्षे असल्याचं दिसून येत आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. आम्ही या घटनेची अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. कोणतीही सुसाईड नोट किंवा ओळखपत्र सापडले नाही. आत्महत्यामागील कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे', अशी माहिती त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर वाढवली सुरक्षा, २४ तास पोलीस तैनात राहणार, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Accident: भरधाव डंपरची दुचाकीसह १७ वाहनांना धडक; १९ जणांचा मृत्यू, अपघाताचा थरारक सीसीटीव्ही VIDEO

Road Accident : ४८ तासांत 3 मोठे अपघात, 53 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Maharashtra Politics: 'मी रमीचा खेळाडू नव्हे, तर...'भाजपमध्ये प्रवेश करताच सांगळेंचा मंत्री कोकाटोंवर घणाघात

Maharashtra Live News Update: ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुतीला फरक पडणार नाही - रामदास आठवले

SCROLL FOR NEXT