'मला तू खूप आवडतेस..' पुण्यात शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार, क्लासमध्ये कुणी नसल्याचं पाहून डाव साधला

Pune Teacher Arrested: पुणे येथील स्वारगेट परिसरातून धक्कादायक बातमी समोर. प्रायव्हेट ट्युशन शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार. परिसरात खळबळ.
Pune Teacher Arrested for Assaulting Students
Pune Teacher Arrested for Assaulting StudentsSaam tv
Published On
Summary
  • पुण्यातील स्वारगेट परिसरात भयंकर घडलं.

  • प्रायव्हेट ट्युशन घेणाऱ्या शिक्षकाची विद्यार्थिनीवर वाईट नजर.

  • आरोपीविरोधात गुन्हा दाखल.

पुणे जिल्ह्यातून एका लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला आहे. स्वारगेट पोलिसांनी विद्यार्थिनीसोबत असभ्य वर्तन केल्याच्या आरोपाखाली एका शिक्षकाला अटक केली आहे. आरोपी शिक्षक आहे प्रायव्हेट ट्युशन्स घेत होता. गुरूवारी सकाळी ट्युशनमध्ये मुलगी एकटी होती. शिक्षकानं तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सुरेश दौलत रौंदल (वय वर्ष ४६) असे आरोपीचे नाव आहे. सुरेश कात्रजच्या आंबेगावातील रहिवासी आहे. आरोपी स्वारगेट परिसराक खासगी ट्युशन्स घेत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७वाजून ४५ मिनिटांनी विद्यार्थिनी क्लासमध्ये एकटी होती. त्यावेळी शिक्षकाच्या डोक्यात सैतान घुसला.

Pune Teacher Arrested for Assaulting Students
लाडक्या बहिणींनो E-KYC केलं की नाही? १५०० अडकतील, स्टेप बाय स्टेप घरीच करा E-KYC

त्यानं विद्यार्थिनीसोबत असभ्य वर्तन केले. सुरेश विद्यार्थिनीच्या जवळ गेला. 'जेव्हापासून तू क्लास जॉईन केला आहेस, तेव्हापासून मला तू खूप आवडतेस. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी तुला शाळेत नौकरी आणि एक सोन्याची अंगठी देईन', असं शिक्षकाने विद्यार्थिनीला म्हटलं. तिने घडलेल्या घटनेबाबत कुटुंबाला माहिती दिली.

Pune Teacher Arrested for Assaulting Students
मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याच्या पुतण्यासह तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; नेमकं कारण काय?

कुटुंबाला यानंतर संताप अनावर झाला. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. स्वारगेट पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शिक्षक सुरेशला अटक केली आहे. त्याच्याविरोधात पॉक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com