मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याच्या पुतण्यासह तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; नेमकं कारण काय?

BJP and Shinde Faction Leaders Targeted in Nashik: नाशिक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ऑपरेशन क्लीन अप मोहिम सुरू केली. नुकतंच भाजप नेते सुनील बागुल यांचे पुतणे अजय बागुलसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
BJP and Shinde Faction Leaders Targeted in Nashik
BJP and Shinde Faction Leaders Targeted in NashikSaam
Published On
Summary
  • नाशिक पोलिसांकडून ऑपरेशन क्लीन अप.

  • भाजप नेत्याच्या पुतण्याला घेतलं ताब्यात.

  • पोलिसांकडून तपास सुरू.

राजकीय गुंडांविरोधात नाशिक पोलीस सध्या अॅक्शन मोडवर आली आहे. काही राजकीय गुंडांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पाऊल उचलण्यास सुरूवात केलीये. पोलिसांनी राजकीय गुंड अर्थात नेत्यांसह काही समर्थकांना ताब्यात घेतलं आहे. नुकतंच भाजपात प्रवेश करणाऱ्या मामा राजवाडे यांना ताब्यात घेतलं आहे. तर, शिंदे सेनेतील पवन पवार यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. तर, भाजपचे नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुलसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नाशिकमध्ये सध्या पोलिसांकडून ऑपरेशन क्लीन अप सुरू आहे. ऑपरेशन क्लीन अपचा आज पाचवा दिवस. पोलिसांनी या कारवाईत भाजप नेते सुनील बागुल यांचे पुतणे अजय बागुल यांच्यासह तिघांना ताब्यात घेतलं आहे. गंगापूर नाका गोळीबारप्रकरणी अजय बागुलसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे.

BJP and Shinde Faction Leaders Targeted in Nashik
कोरोनानंतर 'फ्लू'नं डोकं वर काढलं, 'या' देशातील शाळा अन् डे-केअर सेंटर्स बंद; लॉकडाऊन लागणार?

सध्या सुनील बागुल यांचे पुतणे अजय बागुल यांच्यासह तिघांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. याआधी या प्रकरणी नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मामा राजवाडे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांचीही सध्या चौकशी सुरू आहे. दोन बड्या भाजप पक्षाच्या निगडीत व्यक्तींना ताब्यात घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

BJP and Shinde Faction Leaders Targeted in Nashik
राजगड किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला; तरूणीनं बचावासाठी थेट दरीतच उडी मारली, नेमकं काय घडलं?

शिवसेना शिंदे गटातील कुख्यात गुंड पवन पवार हे देखील नाशिक पोलिसांच्या रडारवर आहेत. विशाल पवार तसेच पवन पवार दोघेही फरार आहेत. पवन पवार याच्यावर हत्या, खुनाचा प्रयत्न, खंडणीसारखे गुन्हे दाखल आहेत. तसेच होर्डिंगप्रकरणीही गुन्हा दाखल आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्यात दोघांविरोधत गुन्हा दाखल आहे. सध्या पोलिसांकडून शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com