राजगड किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला; तरूणीनं बचावासाठी थेट दरीतच उडी मारली, नेमकं काय घडलं?

Young Woman Falls During Sudden Bee Attack: राजगडावर अचानक हल्ला. पर्यटक भयभीत. तरूणीनं दरीत उडी मारली. युवतीला वाचवण्यात यश.
Young Woman Falls from Rajgad During Sudden Bee Attack
Young Woman Falls from Rajgad During Sudden Bee AttackSaam
Published On
Summary
  • पुण्यातील राजगडावर मधमाशांचा हल्ला.

  • ४० वर्षीय तरूणी ४० फूट दरीत कोसळली.

  • पोलीस अन् आपत्ती व्यवस्थापन टिमनं युवतीला वाचवलं.

सचिन जाधव, साम टिव्ही

पुण्यातील राजगड किल्ल्यावरून एक धक्कादायक घटना समोर आली. फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यापासून बचावासाठी तरूणीने दरीत उडी घेतली. दरीत उडी घेतल्यामुळे युवतीला गंभीर दुखापत झाली. तरूणीच्या मनक्याला जबर मार लागल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, पोलीस अन् आपत्ती व्यवस्थापन टिमने युवतीला सुखरूप वाचवले.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजली पाटील (वय वर्ष ४०) असे जखमी तरूणीचे नाव आहे. पुण्यातील राजगड किल्ल्यावर काही पर्यटक गेले. मात्र, फिरत असताना काही पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. त्यावेळी तरूणी अंजली देखील घटनास्थळी उपस्थित होती. मधमाशांनी केलेल्या हल्ल्यानंतर तरूणी घाबरली. तिनं स्वत:च्या बचावासाठी ४० फूट खोल दरीत उडी मारली. या घटनेत युवतीच्या मानक्यामध्ये फ्रॅक्चर झाल्यामुळे ती स्वतः हालचाल करू शकत नव्हती.

Young Woman Falls from Rajgad During Sudden Bee Attack
लाडक्या बहिणींना सरकारकडून दिवाळी भेट; E-KYC करणाऱ्यांना हप्ता मिळाला की नाही?

घटनेची माहिती मिळताच राजगड तालुक्यातील वेल्हे पोलिसांनी, हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने, मध्यरात्री रेस्क्यू मोहीम राबवली. तसेच तरूणीला गडावरून खाली सुखरूप आणले. तसेच उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं.

वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमच्या धाडसी बचाव मोहिमेमुळे, ८ ते ९ तासांच्या प्रयत्नानंतर युवतीला सुरक्षितपणे पायथ्याशी आणण्यात यश आलं. किल्ल्याचा परिसर अत्यंत दुर्गम, उतारदार आणि अंधाराने भरलेला असल्यामुळे रेस्क्यू मोहिम आव्हानात्मक ठरली. रात्रीच्या काळोखात, निसरडा उतार आणि अडचणीच्या पायवाटींवरून ही रेस्क्यू मोहीम राबविण्यात आली.

Young Woman Falls from Rajgad During Sudden Bee Attack
मुंबईकरांनो इथे लक्ष द्या! रेल्वेच्या कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक? पहा वेळापत्रक

अंजली पाटील ही २४ वर्षीय तरुणी राजगडावर फिरण्यासारखी आली असताना, किल्ल्यावरील संजीवनी माची परिसरात ही घटना घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com