Bhayandar Accident CCTV Saam Tv
मुंबई/पुणे

Accident: डंपरला ओव्हरटेक करायला गेले अन् भयंकर घडलं, चाकाखाली येऊन नवरा-बायकोचा जागीच मृत्यू; अपघाताचा थरारक VIDEO

Bhayandar Accident CCTV: भाईंदरमध्ये डंपरने दुचाकीला चिरडलं. या अपघातामध्ये नवरा-बायकोचा जागीच मृत्यू झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

Summary -

  • भाईंदरच्या भोला नगरात डंपरला ओव्हरटेक करताना नवरा-बायकोचा जागीच मृत्यू झाला.

  • मृतांमध्ये दिनेश माली आणि मंजू माली यांचा समावेश असून ते उत्तन परिसरात राहत होते.

  • हा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल आहे.

  • पोलिसांनी डंपर चालकाला अटक करून वाहन जप्त केले आहे.

मनोज तांबे, भाईंदर

भाईंदरमध्ये भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. भाईंदरच्या पश्चिमेकडील भोला नगरात ही अपघाताची घटना घडली. रस्त्यावर एका भरधवा डंपरला ओव्हरटेक करत असताना दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात नवरा-बायकोचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या भाईंदर पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

दिनेश माली (वय ५५ वर्षे) आणि त्यांची बायको मंजू माली (वय ५० वर्षे) असे या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या नवरा-बायकोची नावे आहेत. ते भाईंदर पश्चिमेच्या उत्तन परिसरात राहत होते. त्यांचे भांड्याचे एक छोटे दुकान असून ते उत्तनवरून भाईंदरच्या दिशेने येत असताना ही अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे भाईंदरमध्ये एकच खळबळ उडाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशेन आणि त्याची बायको मंजू हे दोघे दुचाकीवरून जात होते. भोला नगर परिसरात समोरून जाणाऱ्या डंपरला दिनेश यांनी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान त्यांचा तोल गेला आणि नवरा-बायको रस्त्यावर पडले. डंपरखाली चिरडल्या गेल्यामुळे दोघे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच, भाईंदर पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या अपघाताप्रकरणी डंपर चालक जफार देशमुख (वय ५२ वर्षे ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचा डंपर देखील जप्त केला आहे. या अपघाताप्रकरणी पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भाईंदर पोलिस ठाण्यात सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा हल्लाबोल, मुंबईत रास्तारोको आंदोलन|VIDEO

Electric Shock : तारेवरचे कपडे काढताना अनर्थ घडला; विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

Lapandav Serial: स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होणार 'लपंडाव'; 'ही' मालिका अखेर घेणार प्रेक्षकांचा निरोप

Prajakta Mali: युनिव्हर्सिटी टॉपर ते टीव्ही होस्ट; प्राजक्ता माळीचा प्रेरणादायी प्रवास

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाच्या दिवशी ६ ग्रह येणार एकत्र; दुर्मिळ संयोगाचा ३ राशींना होणार भरपूर फायदा

SCROLL FOR NEXT