
वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोड
४० मिनिटांत गाठता येणार भाईंदर
५० मिनिटांचा प्रवास वाचणार
मुंबईकरांचा प्रवास हा आणखी वेगवान होणार आहे. मुंबईकरांसाठी आता लवकरत वर्सोवा ते भाईंदर असा कोस्टल रोड बांधण्यात येणार आहे. वर्सोवा ते भाईंदर कोस्टल रोड बांधण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे.
भाईंदर ते वर्सोवा फक्त ४० मिनिटात गाठता येणार (Versova-Bhayandar in just 40 minutes)
वर्सोवा ते भाईंदर हा कोस्टल रोड ५९.२६ किलोमीटर लांबचा असणार आहे. या मार्गामुळे वसोर्वा ते भाईंदर हा प्रवास खूप सोपा आणि सुखकर होणार आहे. या प्रवासासाठी सव्वा तास लागतो. आता हे अंतर फक्त ४० मिनिटांत पार केले जाणार आहे.त्यामुळे प्रवास जवळपास ५० मिनिटांनी कमी होणार आहे.
वाहतूक कोंडीपासून होणार मुक्तता
मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वर्सोवा ते भाईंदर हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम सुरु करण्यासाठी सध्या परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्याची प्रोसेस सुरु आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन वेगाने करावे, जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया जलदगतीने करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोस्टल रोडची माहिती
एकूण लांबी- ५९.२६ किलोमीटर
मुख्य रस्ता-२१.८६ किमी
गोरेगाव- मुलुंड जोड रस्ता- ४.४७ लांबीचा रस्ता
आंतरबदलाचा रस्ता- ३२.८४ किलोमीटर
वर्सोवा ते भाईंदर प्रकल्कपाअंतर्गत काळवंदन हस्तांतरण प्रस्तावास नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. या मार्गाच्या कामासंदर्भात भूगर्भ मातीचे सर्वेक्षण, प्रकल्पावर काम करत असताना नियोजन व आखणीमधील पर्यावरण, कामाच्या गुणवत्तेबाबत आखणी, वाहतूकीचे व्यवस्थापन याचा आढावा घेतला जात आहे. या प्रकल्पात येणारे साहित्य, यंत्रसामग्री व आराखडा बनवण्याचे काम सुरु आहे.
वर्सोवा ते भाईंदर कोस्टल रोड किती लांब असणार आहे?
या कोस्टल रोडची एकूण लांबी ५९.२६ किलोमीटर असेल.
सध्या वर्सोवा ते भाईंदर प्रवासासाठी किती वेळ लागतो?
सध्या प्रवासासाठी सुमारे सव्वा तास लागतो.
नवीन कोस्टल रोड मुळे किती वेळेची बचत होईल?
या रस्त्यामुळे प्रवास वेळ ४० मिनिटांवर येईल, म्हणजेच ५० मिनिटांची बचत होईल.
या प्रकल्पामुळे काय फायदे होतील?
वाहतूक कोंडीपासून मुक्तता, प्रवास वेळेत बचत, आणि पर्यावरणपूरक रस्ता हे फायदे मिळतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.