ips satya sai karthik saam tv
मुंबई/पुणे

Lonavala: ...तरच लाेणावळ्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यास मदत हाेईल : सत्यसाई कार्तिक यांचे रस्ते विकास मंडळ, पालिकेस पत्र

सहारा पुल येथे तर पुलावरच दुकाने लावली जात आहेत.

दिलीप कांबळे

Lonavala News :

लोणावळ्यातील मॅगी पॉईट (lonavala maggi point) आणि सहारा पुलावरील (lonavala sahara bridge) खाद्य पदार्थांच्या टपऱ्या व दुकाने पूर्णपणे बंद करण्यात याव्यात अशी मागणी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक (satya sai karthik) यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व लोणावळा नगरपरिषद यांच्याकडे केली आहे. (Maharashtra News)

मागील काही दिवसांपासून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मॅगी पॉईट येथे गुन्हेगारी वाढल्याने पोलीस प्रशासनाकडून हा भाग गुन्हे प्रवण क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. मागील काही दिवसात याठिकाणी गुन्हेगारी घटना दाखल झाले आहेत. तसेच रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे तीन मोठे अपघात झाले आहेत.

जिल्हाधिकारी पुणे यांनी ठरवून दिलेल्या वेळेनंतर देखील रात्री उशिरापर्यंत ही दुकाने सुरू असतात. त्यामुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याने गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने ही मागणी करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन दिवसांपूर्वी या ठिकाणाहून गंभीर गुन्ह्यातील आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे. लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात तसेच सतत अती महत्वाच्या व्यक्तीचे दौरे होत असतात. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. याचा पर्यटक व शहरातील स्थानिक नागरिक या सर्वांना त्रास सहन करावा लागतो आहे.

सहारा पुल येथे तर पुलावरच दुकाने लावली जात आहेत. वारंवार सूचना देऊन देखील रहदारीला अडथळा करत ही दुकाने लावली जात असल्याने पोलिसांनी पुढाकार घेऊन लोणावळा नगरपरिषदेकडे कारवाईची मागणी जरी केली असली तरी त्यामुळे टपरी धारकांवर उपासमारीची वेळ येऊ नये याची असे देखील बाेलले जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

SCROLL FOR NEXT