Residents of Titwala participate in a signature campaign protesting frequent power cuts and poor electricity supply. saam tv
मुंबई/पुणे

वीज समस्येवर जनआक्रोश; 700 नागरिकांचा सह्यांमधून संताप

Titwala Electricity Problem Citizen Protest: टिटवाळ्यातील वाढत्या वीज समस्यांविरोधात नागरिकांनी सह्यांच्या माध्यमातून जनआंदोलन उभारले आहे. अवघ्या एका दिवसात 700 हून अधिक लोकांनी सहभाग नोंदवत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

टिटवाळ्यातील वाढत्या वीज समस्यांविरोधात सुरू करण्यात आलेल्या जनआंदोलनाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, अवघ्या एका दिवसात 700 हून अधिक नागरिकांनी सह्या करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. जनतहित फाउंडेशनचे संस्थापक रितेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मांडा पूर्व येथील बँक ऑफ महाराष्ट्रसमोर सुरू असलेल्या या सह्या मोहिमेची सध्या संपूर्ण टिटवाळ्यात चर्चा रंगली आहे.

परिसरात वारंवार होणारी वीज खंडिती, कमी-जास्त दाबाचा वीजपुरवठा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या गैरसोयींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. हजारो ग्राहकांकडून नियमितपणे वीजबिलाच्या स्वरूपात महसूल वसूल केला जात असताना देखील सुरळीत आणि दर्जेदार वीजसेवा मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर रितेश कांबळे यांनी लोकशाही मार्गाने नागरिकांना एकत्र आणत सह्या मोहीम सुरू केली. या मोहिमेला मिळालेल्या प्रतिसादावरून वीज प्रश्न आता केवळ पुरवठ्यापुरता मर्यादित न राहता जनभावनांचा विषय बनल्याचे स्पष्ट होत आहे. आज नाही तर कधीच नाही या भूमिकेतून अनेक नागरिक आंदोलनस्थळी उपस्थित राहत असून, आपल्या हक्कासाठी संघटितपणे आवाज उठविण्याची वेळ आता आल्याची भावना व्यक्त करत आहेत. केवळ सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करून प्रश्न सुटणार नाहीत, तर लोकशक्तीच्या माध्यमातून प्रशासनाला जागे करणे आवश्यक असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.

वीज समस्यांवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांच्या व्यापक सहभागातून आणखी तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. टिटवाळ्यातील या आंदोलनाला दिवसेंदिवस वाढते जनसमर्थन मिळत असून, महावितरण आणि प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कपडे फाडले, दगड उचलले, लाथा बुक्क्यांचा मारा! किल्ले सिंहगडावर भर पावसात तुफान राडा

भाजपला मोठा धक्का; प्रदेश उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा;राजकीय वर्तुळात खळबळ

कोकण हादरलं ! २२ वर्षीय महिला वनरक्षकाचा घरात आढळला मृतदेह; आंबोली परिसरात खळबळ

पाऊस गायब, पण छत्रीसाठी तुफान गर्दी! भाजप नेत्याच्या उपक्रमाची जोरदार चर्चा; खासगी सुरक्षारक्षक तैनात

Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर मोठा हवाई हल्ला; क्षेपणास्त्र कारखाना उद्धवस्त

SCROLL FOR NEXT