Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

Shreya Maskar

सांगली

सांगली हे कृष्णा नदीच्या काठावर वसलेले भारताच्या महाराष्ट्राच्या दक्षिण भागात वसलेले एक प्रमुख शहर आणि जिल्हा आहे.

sangli | pinterest

कृष्णा माई घाट

कृष्णा माई घाट पवित्र कृष्णा नदीच्या काठावर, प्रसिद्ध गणपती मंदिराच्या मागे वसलेले आहे. येथे दगडी पायऱ्यांचे (घाट) मोठे टप्पे आहेत, जिथे बसून तुम्ही संध्याकाळच्या वाऱ्याचा आनंद घेऊ शकता. तसेच येथे बोटिंगचा आनंद घेता येतो.

Krishna Mai Ghat | pinterest

दंडोबा हिल्स

दंडोबा हिल्स समृद्ध वनराई, विविध प्राणी-पक्षी आणि डोंगरावरील शुद्ध, प्रदूषणमुक्त हवेसाठी ओळखले जाते. ट्रेकिंग, हायकिंग आणि प्राचीन गुहा पाहण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

Dandoba Hills | pinterest

सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य

दाट झाडी असलेला हा डोंगराळ भाग 'इको-टुरिझम' आणि सहलीसाठी एक उत्तम ठिकाण आहे.येथे काळवीट, चितळ, सांबर, कोल्हे आणि मोर यांसारखे वन्यजीव पाहायला मिळतात.

Sagareshwar Wildlife Sanctuary | pinterest

चांदोली राष्ट्रीय उद्यान

जंगल सफारीचा आनंद घ्यायचा असेल तर चांदोली राष्ट्रीय उद्यानाला भेट द्या. येथे तुम्हाला जवळून वन्यजीवन अनुभवता येईल.

Chandoli National Park | pinterest

चांदोली धरण

चांदोली धरण हे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर वारणा नदीवर बांधलेले एक प्रमुख मातीचे व काँक्रीटचे धरण आहे. याला 'वारणा धरण' असेही म्हणतात.

Chandoli Dam | pinterest

रामलिंग बेट-बहे

रामलिंग बेट-बहे हे कृष्णा नदीच्या मध्यभागी असलेले एक सुंदर नैसर्गिक बेट आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे.

Bahe Ramalinga | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : किल्ल्यासारखं दिसणारं गणपतीचं मंदिर, मुंबईजवळच आहे 'हे' खास लोकेशन

Mumbai Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...