Manasvi Choudhary
आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सॲप आपल्या दैनंदिन जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे. वैयक्तिक चॅट्स असोत किंवा ऑफिसचे काम, प्रत्येक गोष्टीसाठी व्हॉट्सॲपचा वापर केला जातो.
परंतु, तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या लहान-सहान चुकांमुळे किंवा व्हॉट्सॲपच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट अचानक बंद होऊ शकते.
तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
जर समोरच्या व्यक्तीने तुम्हाला मॅसेज करण्यास किंवा चॅट करण्यास मनाई केले असेल, तरीही वारंवार मॅसेज करणे टाळा. अनेक युजर्सनी स्पॅम किंवा ब्लॉक केल्यास व्हॉट्सॲप तुमच्या अकाउंटवर कारवाई करू शकते.
थर्ड पार्टी ॲप्सचा वापर करून एकाच वेळी शेकडो लोकांना ऑटोमॅटिक किंवा बल्क मॅसेज पाठवणे व्हॉट्सॲपच्या धोरणाच्या विरुद्ध आहे. यामुळे तुमचे अकाउंट तातडीने बॅन होऊ शकते.
कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीचा मोबाईल नंबर त्याच्या परवानगीशिवाय सार्वजनिक करणे किंवा अनोळखी व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये विनाकारण ॲड करणे टाळा. जर लोकांनी तुमच्याविरुद्ध तक्रार केली, तर अकाउंट धोक्यात येऊ शकते.
ब्रॉडकास्ट लिस्टमधून मॅसेज पाठवताना समोरच्या व्यक्तीने तुमचा नंबर सेव्ह केला असणे आवश्यक असते. परंतु, जर तुम्ही एकाच वेळी खूप लोकांना सारखेच प्रचारात्मक किंवा त्रासदायक मॅसेज पाठवत राहिलात, तर लोक तुम्हाला रिपोर्ट करू शकतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.