Manasvi Choudhary
कुर्ती सेट हा आजकालच्या महिला आणि तरुणींसाठी अत्यंत स्टायलिश, कम्फर्टेबल आणि ट्रेडिंग पॅटर्न झाला आहे.
डेली वेअर, ऑफिस किंवा एखादे फंक्शन महिला आपल्या आवडीनुसार कुर्ती सेट परिधान करता. कॉटन, प्रिंटेड, एम्ब्रॉयडरी आणि कुर्ती-पँट सेटमध्ये अनेक डिझाईन आणि नवीन पॅटर्न्स आहेत.
महिलांसाठी 5 बेस्ट आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स कोणते आहेत ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
प्रिंटेड स्ट्रेट कुर्ता सेट डेली वेअरसाठी आणि कॉलेज-ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी बेस्ट आहे. स्ट्रेट कट आणि सुंदर प्रिंटमुळे हे कुर्ती सेट्स ट्रेंडमध्ये आहेत.
डेलीवेअरसाठी प्युअर कॉटनचे कपडे बेस्ट असतात. अमायरा कॉटन कुर्ता सेट दिसायला क्लासी असतो आणि हलका व आरामदायक वाटतो.
राजस्थानी किंवा पारंपरिक ब्लॉक प्रिंट असलेले कुर्ती सेट्स कधीही ट्रेंडमध्ये असतात. या प्रकारच्या कुर्तीवर असणारी पारंपरिक नक्षी कायमच लक्ष वेधी असते.
जर तुम्हाला थोडा हेवी, फॅन्सी आणि फेस्टिव्ह लूक हवा असेल, तर डिझायनर एम्ब्रॉयडरी किंवा वर्क असलेले कुर्ता सेट्स निवडा. सण किंवा एखाद्या कार्यक्रमांसाठी हा लूक एकदम परफेक्ट राहील.
फुलांच्या डिझाईन्सचे कपडे नेहमीच ट्रेंडमध्ये असतात. फ्लोरल प्रिंटेड कुर्ता आणि त्यावर साधी ओढणी किंवा पँट असा हा सेट दिसायला अतिशय फ्रेश वाटतो.