Manasvi Choudhary
ट्रेनने प्रवास करताना रेल्वेच्या अनेक सुविधांची प्रशंसा होते ज्यामध्ये अनेकदा प्रवासी रेल्वेच्या जेवणाविषयी चर्चा करतात.
पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की, रेल्वेच्या जेवणात चपाती बनवण्यासाठी नेमके कोणते पीठ आणि भातासाठी कोणता तांदूळ वापरतात?
IRCTC च्या अधिकृत माहितीमध्ये प्रवाशांना दिला जाणाऱ्या जेवणाबाबत माहिती दिली आहे. IRCTC च्या माहितीनुसार, रेल्वेच्या जेवणात चपात्या आणि इतर पदार्थांसाठी केवळ गव्हाचे पीठच नाही, तर मैदा, बेसन आणि रवा यांचाही वापर केला जातो.
जेवणाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी आयआरसीटीसीने आशीर्वाद, पिल्सबरी, शक्तीभोग, फॉर्च्युन, नेचर फ्रेश, फार्म फ्रेश, राजधानी, आहार आणि अन्नपूर्णा यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सचा वापर केला आहे.
तांदळाच्या बाबतीतही रेल्वेने विशेष काळजी घेतली आहे. वंदे भारत ट्रेन (VBT) आणि सर्व प्रीपेड ट्रेन्समध्ये उच्च दर्जाचा बासमती तांदूळ वापरण्याचे सांगितले आहे.
तर इतर पोस्टपेड ट्रेन्ससाठी चांगल्या प्रतीचा आणि खाण्यासाठी उत्तम असणारा दर्जाचे तांदूळ वापरले जातात. याचा अर्थ असा की, आयआरसीटीसी ट्रेनमधील प्रवाशांच्या श्रेणीनुसार पीठ आणि तांदळाच्या ब्रँडची निवड केली आहे.