Manasvi Choudhary
जेवणानंतर चालणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. पण जेवणानंतर चालण्याचे तुम्ही काही नियम लक्षात घेणे महत्वाचे आहे.
जेवण झाल्यानंतर लगेचच चालण्यास सुरुवात करू नका. जेवण झाल्यावर साधारण १० ते १५ मिनिटांनी हलके चालणे आरोग्यासाठी महत्वाचे आहे. यामुळे अन्न लवकर पचते.
जेवणानंतर अगदी धावपळ न करता साधारण १० ते १५ मिनिटे हलके चालणे महत्वाचे आहे यामुळे पचनक्रिया सुरळीत चालण्यास मदत होते.
जेवणानंतर लगेचच वेगाने चालणे , धावणे किंवा व्यायाम करणे पूर्णपणे टाळावे. जेवणानंतर लगेच वेगाने चालल्यास पोटावर ताण येतो आणि छातीत मळमळणे, अपचन किंवा उलटीसारखा त्रास होऊ शकतो.
अन्नाचे पचन जलद गतीने होण्यास आणि खाल्लेले अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होते.
रात्रीच्या जेवणानंतर चालल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.