Manasvi Choudhary
केळी पौष्टिक फळ आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने केळी खातात.
अनेकजण नियमितपणे रोजच्या डाएटमध्ये केळी खातात. परंतु, अनेकांना प्रश्न आहे की, केळी खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते?
केळी खाल्ल्याने शरीरावर नेमका काय परिणाम होतो आणि ती कशी खावीत हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
केळी खाल्ल्याने वजन वाढते असं नाही. वजन वाढणे किंवा कमी होणे हे तुमच्या एकूण कॅलरीजच्या सेवनावर आणि जीवनशैलीवर अवलंबून असते.
केळीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे केळी खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरल्यासारखे राहते आणि वारंवार भूक लागत नाही.
कच्च्या केळीमध्ये फायबर असते कच्ची केळी खाल्ल्याने साखरेची पातळी वेगाने वाढत नाही.
कच्ची केळी खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया सुधारते आणि वजनही कमी होण्यासाठी फायदा होतो.
पिकलेली केळी चवीला गोड असतात आणि त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असते यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
पण ज्यांना डायबिटीज आहे, त्यांनी पिकलेली केळी खाताना काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढू शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.