कल्याणमध्ये दोन गटांतील जुन्या वादातून गोळीबार
गोळीबारात तरुण गंभीर जखमी
कोळशेवाडी पोलिसांची कारवाई
चार आरोपींना ताब्यात घेतले
संघर्ष गांगुर्डे, कल्याण
Kalyan Aatmnagar Firing News कल्याणमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कल्याण पूर्वेतील आत्मानगर परिसरात दोन गटांमधील जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याने वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत राहुल वर्मा नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्मानगर परिसरात बिंदू आणि प्रेम गुंडा या दोन गटांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता. किरकोळ कारणांवरून दोन्ही गटांमध्ये वारंवार वाद, हाणामारी आणि दहशतीच्या घटना घडत होत्या. स्थानिक नागरिकांमध्येही या वाढत्या तणावामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, शुक्रवारी उशिरा रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास दोन्ही गट आमनेसामने आले. शाब्दिक वादानंतर परिस्थिती चिघळली आणि काही आरोपींनी गोळीबार केला. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेदरम्यान सुमारे तीन ते चार राऊंड गोळीबार करण्यात आला. गोळीबारात राहुल वर्मा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच कल्याण विभागाचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) अशोक होनमाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोळशेवाडी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची परिसरातून धिंड काढण्यात आली.
सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून गोळीबारामागील नेमके कारण, वापरण्यात आलेली शस्त्रे आणि इतर संबंधित आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान या तरुणांकडे दहशत माजवण्यासाठी शस्त्र साठा येतो कुठून आणि यांना परवाना देतं कोण? हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. दरम्यान या गुंडशाहीची पायमुळे खणून काढण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. पोलीस या आरोपींवर काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.