भंडारा जिल्ह्यात गोबरवाही परिसरात धक्कादायक घटना
अल्पवयीन मुलीचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल केला
पाच आरोपींना अटक
पोलीस तपास सुरु
Bhandara Rape Case News भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही (Bhandara Gobarwahi Crime) परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एका अल्पवयीन गर्लफ्रेंडसोबत शरीरसंबंध ठेवतं आक्षेपार्ह परिस्थितीतील व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत बॉयफ्रेंडसह पाच जणांना अटक केली असून त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी संबंधित मुलीसोबतचे प्रायव्हेट व्हिडिओ (Private Video) गुप्तपणे तयार केला आणि त्याचा वापर करून तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओच्या आधारे मुलीवर मानसिक दबाव आणत तिला धमकावण्यात आले आणि तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. मुलीने या प्रकाराला स्पष्ट नकार दिल्यानंतर आरोपींनी तोच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने गोबरवाही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत पाचही आरोपींना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये भावेश यादव (वय १९), क्षितिज पटले (वय १९), बाल्या उर्फ करण चौधरी (वय २१) तसेच दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.