ठाणे : ठाण्यात राहणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. ठाण्याच्या महापालिका क्षेत्रात राहणाऱ्यांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पावसाळापूर्व आवश्यक देखभाल-दुरुस्ती दुरुस्तीचे कामकाज हाती घेण्यात येणार आहे. यामुळे ठाण्यातील काही भागात बुधवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे नागरिकांना पुढील काही दिवस पाणी जपून वापरावे लागणार आहे. (Thane Water supply)
ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र आणि टेमघर जलशुद्धीकरण केंद्र येथील उच्च दाब उप केंद्रातील पावसाळापूर्व आवश्यक देखभाल-दुरुस्ती, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आदी अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे बुधवारी सकाळी ९.०० वाजल्यापासून रात्री ०९.०० वाजेपर्यंत एकूण १२ तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, घोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिद्धांचल, समता नगर, इंटरनिटी, जॉन्सन आणि कळव्याचा काही भाग येथील पाणी पुरवठा १२ तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा (Water Supply) सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
दरम्यान, अंबरनाथमध्ये काही दिवसांपूर्वी उल्हास नदीतून एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी पाणी उपसा करणारी जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला होता. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले होते. यामुळे २४ तास एमआयडीसीकडून ठाणे जिल्ह्याला होणारा पाणीपुरवठा बंद झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.