Mumbai Crime : मुंबई हादरली! 2 कुटुंंबाचा जुना वाद टोकाला गेला; कोयत्याने एकमेकांवर हल्ला, तिघांचा मृत्यू

Mumbai Crime News : मुंबईत जुना वाद टोकाला जाऊन तुफान हाणामारी झाली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे.
mumbai crime news in marathi
mumbai crime news Saam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई : मुंबईच्या दहिसरमध्ये हादरवणारी घटना घडली आहे. मुंबईच्या दहिसरमधील दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाली. दोन्ही कुटुंबीयांतील सदस्यांनी एकमेकांवर चाकू आणि कोयत्याने हल्ला केला. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. एम एच बी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.

मुंबईच्या दहिसरमध्ये दोन कुटुंबीयांतील जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत तिघांचा मृत्यू झाला. दहिसरच्या गणपत पाटील नगर परिसरात या दोन कुटुंबाची तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी एम एच बी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईतील दहिसर पश्चिम भागातील गणपत पाटील नगर या झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या शेख आणि गुप्ता कुटुंबीयांनी 2022 साली एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल होते. तेव्हापासून दोन्ही कुटुंबीयांमध्ये वैमनस्य आहे. गणपत पाटील नगर गल्ली नंबर 14 च्या रस्त्यावर वाद झाला.

mumbai crime news in marathi
Saifullah Khalid Shot Dead : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान लष्कर-ए-तोयबाला मोठा झटका; टॉपच्या दहशतवाद्याला गोळ्या झाडून संपवलं

राम नवल गुप्ता याच्या नारळ विक्री स्टॉलसमोर शेख हा दारू पिऊन आल्यानंतर त्यांच्यांमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर दोघांनी त्यांच्या मुलांना बोलावले. गुप्ताने त्याची मुले अमर गुप्ता, अरविंद गुप्ता आणि अमित गुप्ताला बोलावलं. तर हमीद नसिरुद्दीन शेखने त्याची मुले अरमान हमीद शेख, हसन हमीद शेखला बोलावलं.

mumbai crime news in marathi
Famous Actress Arrested : प्रसिद्ध अभिनेत्रीला पोलिसांकडून अटक; काय आहे संपूर्ण प्रकरण? वाचा

दोघांमध्ये हाताने आणि धारदार शस्त्राने मारामारी झाली. सदर मारामारीमध्ये हमीद शेख, राम नवल गुप्ता(वडील) आणि अरविंद गुप्ता हे मृत झाले आहेत. तर अमर गुप्ता आणि अमित गुप्ता जखमी आहेत. हमीद शेखचे मुले अरमान शेख आणि हसन शेख जखमी आहेत. तिघांचे मृतदेह शताब्दी हॉस्पिटल येथे शवविच्छेदनकरिता पाठवले आहेत. दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. आरोपी जखमी असल्याने अटक करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com