Famous Actress Arrested : प्रसिद्ध अभिनेत्रीला पोलिसांकडून अटक; काय आहे संपूर्ण प्रकरण? वाचा

Famous Actress nusrat faria Arrested in bangladesh : प्रसिद्ध अभिनेत्रीला पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. हत्येचा प्रयत्न करणे या प्रकरणात अभिनेत्रीला अटक करण्यात आली.
nusrat faria News
nusrat fariaSaam tv
Published On

नवी दिल्ली : प्रसिद्ध बांगलादेशी अभिनेत्री नुसरत फारियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. 'मुझिब : दे मेकिंग ऑफ ए नेशन' या सिनेमातील भूमिकेमुळे नुसरत चर्चेत आली होती. या सिनेमात नुसरतने माजी पंतप्रधान शेख हसीना यांची भूमिका साकारली होती. याच अभिनेत्री नुसरतला ढाकाच्या शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. अभिनेत्रीच्या अटकेनंतर चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

nusrat faria News
Fact Check : हेअर ट्रान्सप्लांट कराल तर जीवानं जाल? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? पाहा VIDEO

मीडिया रिपोर्टनुसार, मागील वर्षी शेख हसीना यांच्या विरोधातील आंदोलन दरम्यान झालेल्या एकाच्या हत्येशी संबंधित प्रकरणात अभिनेत्री अडकली आहे. नुसरत फारिया फक्त ३१ वर्षांची आहे. एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्रीला थायलँडला जाताना चेकपाइंटवर थांबवलं.

nusrat faria News
Maharashtra Politics : पवार-ठाकरेंनंतर आंबेडकरी एकत्र? रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकरांच मनोमिलन होणार? पाहा स्पेशल व्हिडिओ

अभिनेत्रीच्या विरोधात हत्येचा प्रयत्न करण्याविषयी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अभिनेत्रीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. बांगलादेशातील नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला होता. तसेच हसीना यांना भारतात आश्रय घ्यावा लागला होता.

nusrat faria News
Bhushan Gavai : सरन्यायाधीश भूषण गवई संतापले, भर कार्यक्रमात काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

बांगलादेशातील वृत्रपत्राने अभिनेत्री नुसरतला अटक करण्याचा वृत्ताला दुजोरा दिला आहे. नुसरत फारियाला २००३ साली केलेल्या शेख हसीना यांच्या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. बांगलादेश आणि भारताच्या संयुक्त प्रयत्नातून हा सिनेमा बनवण्यात आला होता. मुझिब सिनेमा हा प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com