Shrikant Shinde : दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; शिष्टमंडळात स्थान मिळाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

Shrikant Shinde News Update: संयुक्त राष्ट्रसंघासमोर मांडण्यासाठी शिष्टमंडळात स्थान मिळाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार असल्याची प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
Shrikant Shinde News
Shrikant ShindeSaam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका संयुक्त राष्ट्रसंघासमोर मांडण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी तयार केलेल्या शिष्टमंडळात कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. यानिमित्ताने आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे तोंड भरून कौतुक केले.

Shrikant Shinde News
Saifullah Khalid Shot Dead : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान लष्कर-ए-तोयबाला मोठा झटका; टॉपच्या दहशतवाद्याला गोळ्या झाडून संपवलं

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं की, 'ऑपरेशन सिंदूरची भूमिका जगाला पटवून देण्यासाठी तयार केलेल्या सात खासदारांच्या शिष्टमंडळात माझी निवड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. माझ्यासाठी हा सर्वात मोठा क्षण आहे. ही माझ्यासाठी मोठी संधी आहे.

Shrikant Shinde News
Solapur fire : सोलापुरात टॉवेल कारखान्यात अग्नितांडव, ८ जणांचा मृत्यू, कुटुंबाचाही गुदमरून मृत्यू

'हा असा प्लॅटफॉर्म आहे की जिथे देशाची बाजू जगासमोर मांडण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. पाकिस्तान दहशतवादाला आर्थिक मदत करण्याचे काम करत आहे. ज्यामुळे या दहशतवादाचा त्रास केवळ भारतालाच नव्हे तर अमेरिका ब्रिटन सारख्या देशांना बसला आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा जगाच्या नजरेसमोर आणण्यासाठीचा हा एक प्रयत्न असेल, असे ते म्हणाले.

Shrikant Shinde News
Famous Actress Arrested : प्रसिद्ध अभिनेत्रीला पोलिसांकडून अटक; काय आहे संपूर्ण प्रकरण? वाचा

'भारताकडून झालेल्या जाणाऱ्या शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदारांची निवड करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केली आहे. या शिष्टमंडळातील सर्व सदस्य प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत .देशावर आलेल्या संकटाच्या वेळी पक्षभेद बाजूला ठेवून आम्ही सर्व एक आहोत हा संदेश जगाला देण्याचा प्रयत्नही याद्वारे पंतप्रधान मोदी यांनी केले आहे, असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. श्रीकांत शिंदे यांच्या निवडीचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कौतुक केलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com