Thane-Navi Mumbai Elevated Road Saam Tv
मुंबई/पुणे

Thane-Navi Mumbai Travel: ठाणे ते नवी मुंबई एअरपोर्ट प्रवास सुसाट, सहापदरी उन्नत मार्ग होणार तयार; कोणत्या वाहनांना किती टोल?

Thane-Navi Mumbai Elevated Road: ठाण्यावरून नवी मुंबई एअरपोर्टपर्यंतचा प्रवास सुसाट होणार आहे. याठिकाणी सहापदरी उन्नत मार्ग तयार केला जाणार आहे. या मार्गासाठी कोणत्या वाहनांना किती टोल द्यावा लागणार वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • ठाणे ते नवी मुंबई एअरपोर्ट २५ किमी सहापदरी उन्नत मार्ग तयार होणार.

  • प्रकल्पाला ६,३६३ कोटी रुपये खर्च लागणार.

  • २०३१ पर्यंत उन्नत मार्ग होणार तयार.

  • कारसाठी ३६५ रुपये, बस-ट्रकसाठी १२३५ रुपये टोल आकारला जाणार

ठाण्यावरून नवी मुंबईत आणि नवी मुंबईतून ठाण्यात नेहमी प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण प्रवाशांना आता ठाण्यावरून नवी मुंबईमध्ये सुरू होणाऱ्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर सुसाट आणि आरामात पोहचता येणार आहे. यासाठी ठाणे ते नवी मुंबई उन्नत मार्ग तयार केला जात आहे. सहापदरीचा हा उन्नत मार्ग असणार असून ६ हजार ३६३ कोटी रुपये खर्च करून तयार केला जाणार आहे. त्यामुळे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. त्यांना अगदी कमी वेळात एअरपोर्टवर पोहचण्यास मदत होणार आहे. या सहापदरी उन्नत मार्गावर टोल देखील भरावा लागणार आहे. भविष्यात या मार्गावरून प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना किती टोल द्यावा लागणार याची माहिती समोर आली आहे.

२०३१ पर्यंत ठाणे ते नवी मुंबई एअरपोर्ट हा उन्नत मार्ग तयार होईल. हा मार्ग तयार झाल्यानंतर टोल आकारला जाईल. या मार्गावरून एकेरी प्रवास करण्यासाठी ३६५ रुपये मोजावे लागणार आहेत. महत्वाचे म्हणजे, नवी मुंबईमध्ये तयार होणाऱ्या इंटरनॅशनल एअरपोर्टचे काम अंतिम टप्प्यात आहे. एअरपोर्टचे काम पूर्ण होत आले असून महिनाभरात या एअरपोर्टवरून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. एअरपोर्ट सुरू झाल्यानंतर याठिकाणावरून दरवर्षी २० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करण्याची शक्यता आहे. हे एअरपोर्ट २०३८ मध्ये पूर्ण क्षमतेने सुरू होईल. त्यानंतर या एअरपोर्टवरून ९० लाख प्रवासी प्रवास करतील.

नवी मुंबईत तयार झालेल्या या एअरपोर्टचा फायदा ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी आणि भाईंदर या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे. मुंबईऐवजी त्यांना या एअरपोर्टवरून प्रवास करणं अधिक सोपं होईल. ठाण्यातून नवी मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याच वाहतूक कोंडीतून त्यांची सुटका करण्याची आणि त्यांना एअरपोर्टवर अगदी कमी वेळात पोहचण्यासाठी उन्नत मार्ग तयार केला जात आहे.

या सहापदरी उन्नत मार्गाचे काम अर्बन मास ट्रान्झीट कंपनीने हाती घेतले आहे. ठाण्यातील विटावा नाका ते पटणी मैदान ते एअरपोर्ट असा हा उन्नत मार्ग असणार आहे. हा मार्ग २५ किमी लांबीचा असणार आहे. हा उन्नत मार्ग सहा मार्गिकांचा असणार आहे. या उन्नत मार्गाच्या खर्चाचा प्रत्येकी १० टक्के भार ठाणे आणि नवी मुंबई महानगर पालिकेने करावा आणि ५ टक्के भार एमआयडीसीने उचलावा अशी अपेक्षा होती पण त्यांनी नकार दिला. त्यामुळे आता या प्रकल्पाचा खर्च ६० टक्के सिडको, २० टक्के राज्य सरकार आणि २० टक्के केंद्र सरकार करणार आहे.

कोणत्या वाहनांसाठी किती टोल?

चारचाकी हलकी वाहनं (कार) - ३६५ (एकेरी वाहतूक)

हलक्या वाहनांसाठी - ५९० रुपये

ट्रक-बस - १२३५ रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT