
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी
मेट्रो ४ लाइन ट्रायल पुढच्या आठवड्यात सुरु होणार
मुंबई ठाणे कनेक्टिव्हिटीसाठी मेट्रो ४ फायदेशीर
ठाणे येथील आनंद नगरजवळ मुंबई मेट्रो लाइन ४ साठी ट्रायल सुरु होणार आहे. पूर्व उपनगरे आणि ठाण्यातील वाहतूक कोंडीपासून सुटका होण्यासाठी ही मेट्रो खूप सोयीची असणार आहे. कॉरिडॉरमधील ट्रायल रन ही सप्टेंबरमध्ये सुरु होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या मेट्रोमुळे ठाणे आणि मुंबई जोडली जाणार आहे.
मेट्रो ४ लाइनला येलो लाइन म्हटले जाते. ही मेट्रो लाइन वडाळा ते घाटकोपर मार्गे कासारवडवलीपर्यंत धावणार आहे. मुंबई आणि ठाण्याला जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आहे. या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या या मेट्रोच्या पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत. ठाण्यात आलेले ट्रायल कोच हे चाचणीसाठी वापरले जाणार आहे. ४ सप्टेंबरपासून ही ट्रायल सुरु होणार आहे.
मुंबई (Mumbai) आण ठाण्याला जोडणारी मेट्रो ४ सेवा ही पुढच्या वर्षी सुरु होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं. ठाण्यातून जाणाऱ्या या मेट्रो ४ सोबत इंटरचेजिंग स्टेशनसह काम सुरु आहे. हे स्टेशन शेवटच्या स्टेशनपर्यंत कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. यामुळे अनेक प्रवाशांना फायदा होणार आहे. मेट्रोल लाइन ४ साठीच्या रोलिंग स्टॉकचे कंत्राट फेब्रुवारीमध्ये एका कंपनीला देण्यात आले होते. दरम्यान, ठाण्यातील प्रत्यक्ष गाड्या येण्यापूर्णी सिस्टीम आणि ट्रॅकची तयारी तपासण्यासाठी वापरले जातील.या येलो लाइनमुळे मुंबई आणि ठाण्याजवळील प्रवास सोपा होणार आहे.
मेट्रो ४ (Metro 4)
मेट्रो ४ च्या प्रकल्पाची एकूण लांबी ३५ किमी असणार आहे. त्यापैकी ५.३ किमी मार्गिका डिसेंबरमध्ये सुरु केली जाईल. या मार्गिकेवर कॅडबरी, माजीवडा, कारबावडी, मापाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरी पाडा, गायमुख ही स्थानके असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.