Thane Metro  x
मुंबई/पुणे

Thane Metro : ठाणेकरांची वाहतूक कोंडीची कटकट सुटणार, ठाण्यात 'या' दिवशी धावणार मेट्रो

Thane Metro News : ठाण्याच्या मेट्रोच्या ट्रायल रनला मुहूर्त मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे मेट्रोच्या ट्रायरल रन होणार आहे. त्यानंतर मेट्रो लवकरच सुरु होईल.

Yash Shirke

  • सोमवारी होणार ठाण्याच्या मेट्रोचा ट्रायल रन

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणार ट्रायल रन

  • ट्रायल रननंतर मेट्रो लवकरच ठाणेकरांच्या सेवेत धावणार

विकास काटे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Thane : ठाणेकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे शहरातील पहिली मेट्रो ट्रेन ट्रायल रनसाठी सज्ज झाली आहे. येत्या सोमवारी (२२ सप्टेंबर रोजी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ट्रायर रन होणार असल्याचे म्हटले जात आहे. ट्रायर रननंतर मेट्रो लवकरच ठाणेकरांच्या सेवेत धावणार आहे. यामुळे ठाणेकरांना मोठा फायदा होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे मेट्रो प्रकल्पातील १०.५ किमीच्या पहिल्या फेजचे ट्रायल रन सोमवारी (२२ सप्टेंबर) होणार आहे. या ट्रायर रनसाठी मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत. ठाण्यातील मेट्रो मार्गिका ४-४ अ मधील १० स्थानकांवर ट्रायल रन होणार आहे. सप्टेंबर महिन्यात ट्रायर रन करण्यासाठी एमएमआरडीएने तयारी केली होती. मेट्रो लाईन -४ मेट्रो रेल्वे स्टेशनच युद्धपातळीवर काम सुरू आहे.

२५ ऑगस्ट रोजी मेट्रो ट्रेनचे काही डबे स्टेशनवर मेट्रो मार्गिका ४-४ अ या मार्गिकेवर ठेवण्यात आले होते. हा उन्नत मार्ग असल्याने क्रेनच्या मदतीने मेट्रो डबे ट्रॅकवर ठेवण्यात आले होते. आता नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाणे मेट्रो ट्रेनचा ट्रायल रन होणार आहे. वाहतूक कोंडी मुक्त ठाणे शहर करण्याच्या दृष्टीने मेट्रो लवकरच सुरु केली जाणार आहे.

ठाणे मेट्रो मार्गिकेवरील १० स्थानकं

  • १) कॅडबरी

  • २) माजीवाडा

  • ३) कपूरबावाडी

  • ४) मानपाडा

  • ५) टिकूजी -नी -वाडी

  • ६) डोंगरी पाडा

  • ७) विजय गार्डन ,

  • ८) कासरवाडावली,

  • ९) गोवानिवाडा

  • १०) गायमुख

ठाण्यामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. हा प्रश्न सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. ठाण्यामध्ये मेट्रो रेल्वे सुरु झाल्याने वाहनांची संख्या कमी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे मेट्रो प्रकल्पामुळे ठाणे आणि आसपासच्या परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न काही अंशांनी सुटेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - पहिल्या वर्षापासून हिंदी सक्तीला नागपूरातील तज्ज्ञांचा विरोध

Prajakta Mali: थ्री पीस ड्रेसमध्ये खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य, फोटो पाहून नेटकरी करतायत कौतुक

Pune Election : राष्ट्रवादीमधील फूट भाजपच्या पथ्यावर, पुण्यात पुन्हा कमळ फुलणार की घड्याळाची टिकटिक वाजणार?

Maharashtra Transport : ओला-उबरसारख्या अ‍ॅप कंपन्यांच्या भाडेवाढीला लगाम, वाचा राज्य सरकारचा नेमका प्लॅन काय?

Politics: आमदाराविरोधात ईडीची मोठी कारवाई, ४० किलो सोन्यासह १०३ कोटींची मालमत्ता जप्त

SCROLL FOR NEXT