Metro 4 Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Metro: घोडबंदरची वाहतूक कोंडी फुटणार; कासारवडवली - गायमुख मेट्रोच्या लोकार्पणाची तारीख समोर

Thane Metro Launch Date Announced: घोडबंदरच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. कासारवडवली- गायमुख मेट्रोच्या लोकार्पणाची तारीख समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

कासारवडवली ते गायमुख या मेट्रो 4 अ मार्गिका महत्वाची आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे कासारवडवली ते गायमुख या मेट्रो 4 अ प्रकल्पात 63.67 कोटींची वाढ झाल्याची कबुली मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेकडे विविध माहिती विचारली होती. मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेने अनिल गलगली यांस सविस्तर माहिती दिली. सदर मे. जे.कुमार इंफ्राप्रोजेक्टस लि. यांस दिले असून अपेक्षित खर्च 440.84 कोटी होता ज्यात 63.67 /- कोटीची वाढ झाली आहे.

मे. जे.कुमार इंफ्राप्रोजेक्टस लि. यांस 11 सप्टेंबर 2019 रोजी कार्यादेश देण्यात आले असून काम पूर्ण करण्याची तारीख 31 मार्च 2024 अशी होती. सध्या वाढीव मुदतवाढ दिली असून ती तारीख एप्रिल 2025 अशी आहे.

मे. जे.कुमार इंफ्राप्रोजेक्टस लि. तर्फे कामात करण्यात आलेल्या दिरंगाईमुळे त्यास 22 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. हा दंड मे. जे.कुमार इंफ्राप्रोजेक्टस लि. तर्फे अदा केलेला आहे.

अनिल गलगली यांच्या मते या मार्गिकेमुळे घोडबंदर मार्गावर मेट्रोचा पर्याय निर्माण होणार आहे. त्यामुळे युद्धस्तरावर काम होणे आवश्यक आहे. मेट्रो 4 अ गायमुख ते शिवाजी चौक, मेट्रो 10 आणि कासारवडवली, ठाणे ते वडाळा मेट्रो 4 या दोन मार्गिकांना जोडणारी मार्गिका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माजी आमदार सपकाळांनंतर आणखी एक निष्ठावंत शिलेदाराने सोडली साथ, उद्धव ठाकरेंना पुन्हा एक धक्का

Maharashtra Live News Update : ठाकरे बंधूंच्या दौऱ्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये

Gajar Recipe: गाजरचा फक्त हलवा नाही, तर हे 5 पदार्थ आजच घरी ट्राय करा

महायुद्ध अटळ! छोटीशी ठिणगी उडवेल युद्धाचा भडका, भारतालाही बसणार फटका

Korean Face Mask: घरच्या घरी बनवा कोरियन फेस मास्क; २ वापरात मिळेल ग्लोईंग सॉफ्ट चेहरा

SCROLL FOR NEXT