
मुंबईकर आणि उपनगरातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता उपनगरातून मुंबईला जाणं जलद होणार आहे. लवकरच मुंबईत 12 वी मेट्रो कल्याण ते तळोजा लाइन सेवेत येणार आहे. मुंबई मेट्रोचा 22.17 किमीचा विस्तार होणार असून ही मेट्रो लाईन कल्याण आणि तळोजा या प्रमुख औद्योगिक आणि निवासी क्षेत्राशी जोडला जाणार आहे. ही मेट्रो लाइन्समुळे प्रवासाचा वेळ कमी करेल. तसेच मेट्रो लाइनमुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत करणार आहे.
शहराचा विकास आणि प्रगती करणारा हा मेट्रो मार्ग 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. कल्याण आणि तळोजाला जोडणाऱ्या या मेट्रो लाइनवर 19 स्टेशन असणार आहेत. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (MMRDA) ने मेट्रो लाईन 12 साठी पिल्लर उभारण्यास सुरुवात करण्यात आलीय. या कॉरिडॉरमध्ये 19 स्थानके असणार आहेत. कल्याण, डोंबिवली आणि तळोजा दरम्यानचा प्रवास वेळ अंदाजे 45 मिनिटांनी कमी होणार आहे. नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हा प्रकल्प तयार करण्यात आलाय.
किती अंतराचा असेल मार्ग- 22.17 किलोमीटर
किती स्टेशन संख्या - 19
कोण-कोणत्या भागातून जाणार मेट्रो- कल्याण, डोबिंवली, तळोजा, कोळेगाव
मार्च 2024 कधी पूर्ण होणार डिसेंबर 31, 2027
प्रकल्प खर्च - 5,865 कोटी
मेट्रो लाईन 12 चा मार्ग कल्याण ते तळोजाला जोडणारा आहे. ही मेट्रो डोंबिवली आणि कोळेगावमधून जाणार असून कल्याण येथील लाईन 5 (ऑरेंज लाईन) ला जोडणारा आहे. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ ४५ मिनिटांनी कमी होईल. तसेच रस्ते आणि लोकल ट्रेन्सवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल.
कल्याण एपीएमसी - मेट्रो लाईन 5 - ऑरेंज लाईनवरील इंटरचेंज
कल्याण
गणेश नगर (कल्याण)
पिसावली गाव
गोळवली
डोंबिवली एमआयडीसी
सागाव
सोनारपाडा
मानपाडा
हेडुटेन
कोळे गाव
निलजे गाव
वडवली
गाठ
वॉकलन
तुर्भे
पिसर्वे डेपो
पिसर्वे
अमानदूत (तळोजा) – नवी मुंबई मेट्रो लाईन १ वर इंटरचेंज
दुर्गाडी किल्ला: कल्याणमध्ये असलेला हा ऐतिहासिक किल्ला प्रस्तावित कल्याण मेट्रो स्टेशनपासून सुमारे दोन किमी अंतरावर आहे.
काळा तालाब तलाव: कल्याणमध्ये असलेला हा सुंदर तलाव कल्याण मेट्रो स्टेशनपासून तीन किमी अंतरावर आहे.
गणेश घाट: कल्याण मेट्रो स्टेशनपासून सुमारे चार किमी अंतरावर असलेलं गणेश घाट
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.