Vande Bharat Sleeper : मुंबईत धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन, ट्रायल रनचे व्हिडीओ व्हायरल

Mumbai Vande Bharat Sleeper : अहमदाबाद-मुंबई यादरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेनचे ट्रायल रन घेण्यात आले. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Vande Bharat
Vande Bharat
Published On

Vande Bharat sleeper News : वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी धावणार? नवीकोरी स्लीपर ट्रेन कशी असेल? तिकिट किती असेल? याची उत्सुकता सर्वांनाच आहे. काही दिवसांतच वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहे, पण त्याआधी ट्रायल सुरू आहे. बुधवारी वंदे भारत स्लीपरची ट्रायल आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai News) पार पडली. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सुविधायुक्त वंदे भारत स्लीपर रेल्वे गाड्यांच्या मागील काही दिवसांपासून चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांमध्ये वंदे भारत स्लीपर रेल्वे गाडीने ताशी १३० ते १८० किलो मीटर वेग गाठल्याची माहिती. लवकरच या रेल्वे गाडांची सुविधा देशभरातील रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे, त्याआधी जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत या चाचण्या सुरूच राहणार आहेत. बुधवारी मुंबई-अहमदाबाद मार्गावर वंदे भारत स्लीपर गाडीची चाचणी झाली. आता चाचणी पूर्ण झाल्यानंतर रेलवे सुरक्षा आयुक्त द्वारे कमाल वेगाबाबत गाडीचे मूल्यांकन केले जाईल. अंतिम टप्प्यात यशस्वी झाल्यानंतरच , वंदे भारत गाडयांना अधिकृतपणे प्रमाणित केले जाईल आणि भारतीय रेल्वेत सामील केले जाईल, अशी माहिती मिळाली आहे.

Vande Bharat
Vande Bharat Train: अमरावतीकरांना गुड न्यूज! २ वंदे भारत ट्रेन मिळणार; कुठून कुठे धावणार? जाणून घ्या वेळापत्रक आणि थांबा

अहमदाबाद ते मुंबई अशी वंदे भारत स्लीपरची ट्रायल रन बुधवारी घेण्यात आली. ही स्लीपर ट्रेन लवकरच धावण्यास सज्ज झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद रेल्वे मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन तब्बल 130 Kmph वेगाने धावली. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुंबईच्या मुंबई सेंट्रल स्थानकावर अनेकांनी फोटो काढले.

Vande Bharat
Vande Bharat : महाराष्ट्राला २ स्लीपर वंदे भारत मिळणार, कुठे कुठे धावणार, कुठे थांबणार?

वंदे भारत एक्स्प्रेस सुपरफास्ट असल्याने कमी वेळात जास्त अंतर गाठते. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वंदे भारतने प्रवास करणे सोयीचे ठरते. आधी सात ते आठ तासाच्या अंतरासाठी वंदे भारत ट्रेन धावली जात होती. आता त्यामध्ये स्लीपर ट्रेनची भर पडली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास अधिक आरामदायी आणि जलद होणार आहे. या ट्रेनमध्ये पेन्ट्री कारही असणार आहे. याशिवाय गार्ड कोच, लगेज कोच असणार आहे.

Vande Bharat
Vande Bharat Express: पुण्याला मिळणार आणखी ४ वंदे भारत, कुठून कुठपर्यंत धावणार; ही ४ शहरं आणखी जवळ येणार

वंदे भारत स्लीपर कधी धावणार ?

पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मार्ग अद्याप समोर आलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेन दिल्ली-मुंबई किंवा दिल्ली-कोलकाता अथवा मुंबई-अहमदाबाद या मार्गावर चालवली जाऊ शकते. यासाठी ट्रेनची ट्रायल घेतली जात आहे. त्यामध्ये ताशी 160 ते 180 किलोमीटर वेगाने ट्रेन चालवली जात आहे. जानेवारीअखेर ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येईल, असे समजतेय.

वंदे भारत स्लीपर ट्रेनची वैशिष्ट्ये:

या ट्रेनमध्ये स्लीपर कोचेस आहेत, ज्यामुळे रात्रीच्या प्रवासात प्रवाशांना चांगला आराम मिळेल.

ट्रेनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, ज्यामुळे वेगाने प्रवास होईल, परंतु प्रवाशांना कोणताही धक्का किंवा अस्वस्थता जाणवणार नाही.

वंदे भारत स्लीपर ट्रेन वेगाने धावते, ज्यामुळे वेळेची बचत होईल. ही ट्रेन इतर पारंपारिक ट्रेनपेक्षा जास्त जलद आहे.

प्रवाशांना चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ दिले जातील. स्लीपर ट्रेनमध्ये प्रवास करताना आरामदायी जेवणाचा अनुभवही मिळेल.

स्लीपर डब्ब्यांमध्ये प्रत्येक प्रवाशासाठी इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट, स्वच्छ आणि आधुनिक टॉयलेट्स, अर्धस्वयंचलित दरवाजे, आणि एलईडी लाइट्स अशा सुविधा उपलब्ध आहेत.

स्लीपर कोचेस पूर्णपणे वातानुकूलित आहेत, ज्यामुळे प्रवाशांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्येही आरामदायी प्रवास अनुभवता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com