BKC To Worli Metro: बीकेसी ते वरळी मेट्रो १०० दिवसांत सुरु करा, उपमुख्यमंत्र्यांचे MMRC ला निर्देश

BKC To Worli Metro 3: मेट्रो ३चा दुसरा टप्पा येत्या १०० दिवसांत पूर्ण करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी MMRDA ला दिले आहेत. त्यामुळे लवकरच बीकेसी ते वरळी मेट्रो सेवा सुरु होणार आहे.
Metro 3
Metro 3AI Image
Published On

मेट्रो ३चा पहिला टप्पा सुरु झाला आहे. त्यानंतर आता दुसरा टप्पा लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो मार्गामधील दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार आहे.

मेट्रो ३ मधील बीकेसी ते कुलाबा अशा दुसऱ्या टप्प्याचे काम जवळपास ९२ टक्के पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी जून महिन्यापर्यंतचा वेळ लागू शकतो. दरम्यान, बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशन हा मार्ग मार्चपर्यंत सुरु करण्याची शक्यता आहे. (Metro 3 Project)

Metro 3
Metro Subway: १०० कोटींचा खर्च, ३०६ मीटर लांबी; मंत्रालय-विधान भवन जोडणारा सबवे पुढच्या वर्षी खुला होणार

एकनाथ शिंदे यांनी येत्या १०० दिवसाच्या आता बीकेसी ते वरळी मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करावी, असे निर्देश एमएमआरसीला दिले आहेत. त्यानंतर आता बीकेसी ते वरळीदरम्यानच्या मेट्रोच्या कामाला वेग आला आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मेट्रो हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. मेट्रोचे ३३८ किमीचे जाळे तयार झाल्यानंतर एमएमआपरच्या एका टोकावरुन दुसऱ्या टोकाला अवघ्या काही मिनिटांत जाता येईल. आता मेट्रोल ३ मार्गिका लवकरच पूर्ण सुरु केली जाणार आहे. या मेट्रोल ३ च्या कामाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या वर्षात ५० किलोमीटरपर्यंतची मेट्रो मार्गिका सुरु व्हायला हवी असे निर्देश MMRDA ला देण्यात आले आहेत.यातील २१ किलोमीटरचा मेट्रो प्रकल्प हा मेट्रो ३ चा असणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. (BKC To Worli Metro Starting In 100 Days)

Metro 3
Pune Metro : चोरट्यांचा प्रताप, चक्क पुणे मेट्रोच्या खांबांची चोरी, ६ जणांना ठोकल्या बेड्या

मेट्रो ३ चा कुलाब्यापर्यंतचा शेवटचा टप्पा या वर्षात पूर्ण करणार असल्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. मेट्रो ३ चा दुसरा टप्पा १०० दिवसांत खुला करण्याचेही त्यांनी सांगितले आह. आतापर्यंत भुयारी मार्गाचे काम ९९.१ टक्के पूर्ण झाले आहे. या मेट्रो ३ चे पूर्ण काम या वर्षात पूर्ण होऊ शकते.

Metro 3
Vande Bharat Sleeper : मुंबईत धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन, ट्रायल रनचे व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com