Thane Traffic saam tv
मुंबई/पुणे

Thane Traffic : घोडबंदर रोड ४ दिवसांसाठी बंद राहणार, कधी आणि केव्हा? पर्यायी मार्ग कोणते?

Thane News : ठाण्यातील घोडबंदर रोडवर वाहतूक विभागाकडून दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. यामुळे या ठिकाणी ४ दिवस वाहतुक बंद राहणार आहे. नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Yash Shirke

  • ठाणेकरांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

  • घोडबंदर रोड तब्बल ४ दिवसांसाठी बंद राहणार आहे.

  • यादरम्यान कोणत्या पर्यायी मार्गांचा वापर करावा? वाचा

Thane : ठाणेकरांसाठी मोठी माहिती समोर आली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवर असलेल्या गायमुख घाट परिसरात रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर वाहतूक विभागातील पोलीस आयुक्तालयाच्या कासारवडवली वाहतूक उपविभागाने वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत.

शुक्रवारी ८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२.०१ वाजता कामाला सुरुवात होणार आहे. सोमवारी ११ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत काम सुरु राहणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. या कालावधीत काही मार्गांवर जड व अवघड वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

प्रवेशबंदी कुठे?

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे शहर या मार्गाने घोडबंदरला/ गुजरातला जाणाऱ्या जड वाहनांना कापुरबावडी जंक्शन आणि वाय जंक्शन येथे प्रवेश बंद असणार आहे. मुंब्रा किंवा कळवा या मार्गाने घोडबंदरला येणाऱ्या वाहनांना खारेगाव टोल नाक्यावर प्रवेशबंदी असणार आहे. याशिवाय नाशिकवरुन येणाऱ्या वाहनांना मानकोली नाक्यावर प्रवेश करता बंद असणार आहे.

पर्यायी मार्ग कोणते?

  • वाय जंक्शन/कापुरबावडी येथून नाशिक रोड, खारेगाव टोल, मानकोली आणि अंजूरफाटा मार्गे वाहने वळवली जातील.

  • मुंब्रा/कळवा मार्गावरून येणारी वाहने खारेगाव खाडी पुलाखालून मानकोलीमार्गे वळवली जातील.

  • नाशिककडून येणारी वाहने मानकोली पुलाखालून अंजूरफाटा मार्गे वळवली जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Dhanteras : धनतेरसच्या दिवशी धण्याची खरेदी का केली जाते? जाणून घ्या

Shocking News : संतापजनक! शासकीय बाल सुधारगृहात १० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

Maharashtra Live News Update: बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन

अतिरिक्त पोलीस महासंचालकांनंतर सहायक उपनिरीक्षकांनी आयुष्य संपवलं; पोलीस दलात पुन्हा खळबळ, हरियाणात नेमकं काय घडतंय?

Bigg Boss 19: अशनूर चिडली गौरव खन्नावर, फरहानाने केला अमालचा अपमान; काय घडलं बिग बॉसच्या घरात

SCROLL FOR NEXT