Pune Bengaluru Highway : गुड न्यूज! मुंबई-पुणे-बंगळुरू महामार्गाने प्रवास होणार सुसाट, पुण्याहून बंगळुरू गाठा फक्त ५ तासांत

Mumbai Pune Bengaluru Highway : मुंबई-पुणे-बंगळुरू या तीन शहरांना जोडणाऱ्या नव्या हाय-स्पीड महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या महामार्गामुळे पुणे-बंगळुरू प्रवास ५ तासांमध्ये करणे शक्य होणार असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
Mumbai Pune Bengaluru Highway
Mumbai Pune Bengaluru HighwaySaam Tv
Published On
Summary
  • पुण्याहून बंगळुरू फक्त ५ तासात गाठता येणार

  • मुंबईहून पुण्याला ९० मिनिटांत पोहोचता येणार

  • नव्या महामार्गाबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा

Pune : 'मुंबई, पुणे आणि बंगळुरूला जोडणाऱ्या नवीन हाय-स्पीड महामार्गाचे बांधकाम सुरु आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास फक्त ९० मिनिटांत आणि पुणे-बंगळुरू प्रवास फक्त पाच तासात करणे शक्य होणार आहे', अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

नवीन एक्स्प्रेसवे हा मुंबईतील अटल बोगद्यापासून सुरु होऊन पुढे प्रस्तावित पुणे रिंग रोडला जोडला जाईल. त्यानंतर तो बंगळुरूपर्यंत पोहोचेल. या प्रकल्पाचे काम आधीच सुरु झाले आहे. पायाभरणी करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही असे म्हणत नितीन गडकरी यांनी औपचारिकता सोडून प्रकल्पाच्या प्रगतीवर भर दिला.

Mumbai Pune Bengaluru Highway
Maharashtra Politics : मुंबईत ठाकरे गटाला खिंडार, शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

नितीन गडकरी यांनी आंध्रप्रदेशमध्ये अलीकडेच २७२ किमी लांबीच्या २९ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. या प्रकल्पासाठी ५,२३३ कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे. मंगलागिरी येथे आयोजित कार्यक्रमामध्ये आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, केंद्रीय मंत्री किंजरापु राम मोहन नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर उपस्थित नेते होते. आंध्रप्रदेशातील दोन प्रमुख महामार्गांची अपडेट गडकरींनी दिली.

Mumbai Pune Bengaluru Highway
Rahul Gandhi : जनता काँग्रेसच्या प्रश्नांची उत्तरे मागतंय, म्हणून निवडणूक आयोगानं...; राहुल गांधींचा खळबळजनक आरोप

राष्ट्रीय महामार्ग -

राष्ट्रीय महामार्ग ७१ (मदनपल्ले-पिलेरू विभाग)

५६ किमी लांबी, ४-लेन कॉरिडोर, ९ उड्डाणपूल, एक रेल्वे ओव्हरब्रिज, १९ पूल आणि अनेक अंडपास

राष्ट्रीय महामार्ग ३४० सी (कर्नूल-मंडलेम विभाग)

३१ किमी लांबी, ४-लेन रस्त्याचे पक्के कॉरिडोर, एक उड्डाणपूल, चार व्हायाडक्ट आणि अनेक अंडरपास

Mumbai Pune Bengaluru Highway
Kalyan : कल्याणमध्ये मराठी-अमराठी वाद! परप्रांतीय हॉटेलचालकाचे मराठी माणसांबद्दल अपशब्द, मनसैनिकांनी काय केलं पाहा; VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com