Swiggy Instamart, Amazon-Linked Warehouse Face FDA saam tv
मुंबई/पुणे

Swiggy Instamartमध्ये उंदीर अन् झुरळांचा सुळसुळाट! Amazonच्या गोदामासह १० अन्न आस्थापनांवर FDAचा बडगा

Mumbai Food Safety Crackdown: मुंबईत अन्न सुरक्षा आणि स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० आस्थापनांवर FDAने कारवाई केली. स्विगी इंस्टामार्टच्या डार्क स्टोअरमध्ये उंदीर, झुरळे आणि अस्वच्छता आढळली. Amazonसाठी कार्यरत गोदामासह काही आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईकरांच्या अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्न सुरक्षा आणि स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० आस्थापनांवर कठोर कारवाई केली आहे. यामध्ये बॅलार्ड इस्टेटमधील Swiggy Instamartचे डार्क स्टोअर, कांदिवली पूर्वेतील Amazonसाठी कार्यरत गोदाम, मालाडमधील प्रसिद्ध Sadguru Sweets and Farsan Mart यांच्यासह मिठाई दुकाने, हॉटेल्स आणि खाद्य आस्थापनांचा समावेश आहे. काही आस्थापनांचे परवाने/नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

बॅलार्ड इस्टेट येथील M/s. Swinsta ENT Private Limited (Swiggy Instamart डार्क स्टोअर)ची FDAने तपासणी केली असता गंभीर प्रकार समोर आला. दुकानाच्या हाताळणी क्षेत्रात जिवंत उंदीर आढळला. अनेक १० किलोच्या तांदळाच्या पिशव्या उंदरांनी कुरतडून फाडल्याचे तसेच धान्य जमिनीवर सांडलेले आढळले. प्रमुख साठवणूक क्षेत्रात उंदरांच्या विष्ठेच्या खुणाही आढळल्या.

याशिवाय अन्नपदार्थांवर झुरळांचा प्रादुर्भाव, साठवणुकीच्या कार्टमध्ये जिवंत माश्या, तर रेफ्रिजरेशन युनिटमध्ये मृत कीटक, धूळ आणि मोठ्या प्रमाणात बर्फ साचल्याचे तपासणीत निदर्शनास आले. अन्न साठवणूक क्षेत्रालगत अस्वच्छ स्वच्छतागृह आणि उघड्या अन्नपदार्थांवर घाणेरडे साफसफाईचे फडके आढळल्याने FDAने गंभीर दखल घेतली.

या त्रुटींमुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित आस्थापनेचा अन्न परवाना १६ सप्टेंबर २०२६पासून अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आला आहे. M/s. Sadguru Sweets and Farsan Mart, मालाड पूर्व येथेही FDAला गंभीर अस्वच्छता आढळली. विक्री काउंटरवरील तयार खाण्यायोग्य मिठाईवर घरमाश्या बसलेल्या आढळल्या. उत्पादन विभाग आणि विक्री काउंटरमध्ये योग्य विभाजन नसल्याचेही निदर्शनास आले. आस्थापनेकडे खरेदी-विक्रीची बिले, कच्च्या मालाच्या पावत्या तसेच मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचे तपासणी अहवाल उपलब्ध नसल्याचे आढळले. साठा व्यवस्थापनातील FIFO/FEFO तत्त्वांचे पालन होत नसल्याचेही तपासणीत समोर आले. त्यामुळे संबंधित नोंदणी प्रमाणपत्र १७ सप्टेंबरपासून तात्काळ निलंबित करण्यात आले.

कांदिवली पूर्वेतील M/s. Acculogicx Supply Chain Solutions Pvt. Ltd. या Amazonसाठी कार्यरत गोदामाची तक्रारीनंतर FDAने आकस्मिक तपासणी केली. येथे जलनिस्सारणाच्या गंभीर समस्या, तुटलेल्या फरशा, सांडपाणी साचणे आणि घाण-तेलकट साचा आढळला. अन्न साठवणूक आणि पॅकेजिंग साहित्याजवळ स्वच्छता रसायने व अन्नेतर वस्तू ठेवण्यात आल्याचे आढळले. कर्मचाऱ्यांकडे आवश्यक संरक्षणात्मक पोशाख आणि संपूर्ण वैद्यकीय नोंदी नसल्याचे, तसेच नाशवंत अन्नाच्या तापमान नोंदी उपलब्ध नसल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे या आस्थापनेचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.

मोहम्मद अली रोडपासून वर्सोव्यापर्यंत कारवाई

‘Safe Food Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत मोहम्मद अली रोडवरील Suleman Usman Mithaiwalaवरही कारवाई करण्यात आली. अन्न तयार करण्याच्या व साठवणुकीच्या भागात जलनिस्सारण व कचरा क्षेत्रापासून आवश्यक भौतिक विभाजन नसल्याचे आढळले. तयार मिठाई अस्वच्छ वातावरणात ठेवण्यात आल्याचेही तपासणीत समोर आले. याशिवाय चेंबूरचे Nice Enterprises, कांदिवली पश्चिमचे Jain Sweet & Bhelpuri House LLP, घाटकोपर पूर्वेतील Go Green Food Hospitality, लालबाग-परळमधील Swad Snacks Corner, तसेच वर्सोव्यातील Lucknowi Kebab आणि Zaika Moradabadi Hotel यांच्यावरही अन्न सुरक्षा व स्वच्छता नियमांच्या उल्लंघनांप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: गोविंदानं केलं दुसरं लग्न? दुसऱ्या पत्नीसोबत गोविंदा राजाच्या दर्शनाला?

Rain Alert : १९ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; अनेक राज्यांना वादळी तडाखा, ताशी ८० किमी वेगाने वाहणार वारे

Maharashtra News Live Update: खाजगीकरणावरून अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या PA ला १,५०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं; टीप मिळाली अन् ACB ने अलगद टिपला

भाजपला निवडणुकीआधी मोठा धक्का; केंद्रातील मित्रपक्षानं सोडली साथ, दुसऱ्या पक्षाशी बांधली युतीची गाठ

SCROLL FOR NEXT