तुकाराम मुंढेंच्या एफडीएची मोठी कारवाई, १२ लाखांचा गुटखा जप्त अन् १४ हॉटेल्सचे परवाने निलंबित

Tukaram Mundhe, Maharashtra FDA : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली एफडीएने महाराष्ट्रात अन्न भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात धडक मोहीम राबवली. नागपूरमध्ये १२.१० लाखांचा बेकायदेशीर गुटखा जप्त करण्यात आला.
Tukaram Mundhe Action On Mumbai Hotels Update
Tukaram Mundhe Action On Mumbai Hotels UpdateSaam Tv
Published On

Tukaram Mundhe FDA action against illegal gutkha in Maharashtra : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संपूर्ण महाराष्ट्रात बनावट अन्नपदार्थ आणि अस्वच्छतेविरोधात धडक मोहीम उघडली आहे. या मोहिमेदरम्यान नागपूर विभागात तब्बल १२.१० लाख रुपयांचा बेकायदेशीर गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली असून, वाहतुकीसाठी वापरलेली दोन वाहने ताब्यात घेऊन ३ जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय, राज्यभरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि अस्वच्छता बाळगणाऱ्या १४ हॉटेल्स व उपाहारगृहांचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत.

अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. तसेच अन्नपदार्थांमधील भेसळ किंवा तक्रारीसाठी नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा एफडीएच्या तक्रार पोर्टलवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Tukaram Mundhe Action On Mumbai Hotels Update
क्रूरतेची सीमा ओलांडली! राजधानीत अल्पवयीन मुलांनी रचला भयंकर कट; तरुणीसोबत नको ते केलं अन्...

मुंबईत मोठी कारवाई: नायर रुग्णालयाचे कॅन्टीन आणि ब्लिंकिटवर बंदी

अन्न सुरक्षेचे गंभीर उल्लंघन केल्यामुळे एफडीएने मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणी कडक पावले उचलली आहेत. ग्राहकाच्या तक्रारीनंतर कुलाब्यातील ऐतिहासिक 'ऑलिंपिया कॉफी हाऊस'चा परवाना त्वरित निलंबित करण्यात आला. तेथील अन्न साठवणुकीच्या जागेजवळच मूत्रालय असणे, झुरळे-माश्यांचा प्रादुर्भाव, मांसाचे डाग आणि अस्वच्छ पाण्याचा वापर यांसारख्या गंभीर त्रुटी आढळून आल्या. याशिवाय, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये अस्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचा भंग झाल्यामुळे त्याचे कॅन्टीन लायसन्स निलंबित करण्यात आले आहे. चेंबूर येथील 'ब्लिंकिट' (Blink Commerce Pvt Ltd), घाटकोपरचे 'विश्वास स्वीट्स' व 'A-1 ड्रायफ्रूट्स', वरळीचे 'मिलान पंजाब' आणि मलाडचे 'सद्गुरु स्वीट्स' यांचेही परवाने रद्द करण्यात आले आहेत.

Tukaram Mundhe Action On Mumbai Hotels Update
Rahul Gandhi : आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी, आता तृणमूल... राहुल गांधींच्या पोस्टने राजकीय वर्तुळात भूकंप

राज्यभरात दुग्धजन्य पदार्थ आणि बनावट खव्यावर धाडी

सणांच्या काळात भेसळ रोखण्यासाठी एफडीएने ठाणे, पालघर, पुणे आणि कोल्हापूर परिसरात विशेष तपासणी केली. या मोहिमेत एकूण ७.३८ लाख रुपये किमतीचा २,८१३ किलोचा खवा, मावा आणि मिठाईचा साठा जप्त करण्यात आला. ठाण्यातील काशिमीरा पोलीस ठाण्यासमोर दोन वेगवेगळ्या वाहनांमधून अस्वच्छ आणि संशयास्पद परिस्थितीत वाहून नेला जाणारा ५.८६ लाख रुपयांचा खवा आणि स्वीट मावा जप्त करण्यात आला. तसेच पालघरच्या चारोटी टोल नाक्यावर, सातारच्या कराडमध्ये आणि कोल्हापूरच्या शिरोळमध्येही अस्वच्छतेत बनवलेले दुग्धजन्य पदार्थ ताब्यात घेण्यात आले.

संशयास्पद साठा जप्त;

या मोहिमेदरम्यान राज्यभरात एकूण २७ हॉटेल्स आणि उपहारगृहांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४ संस्थांचे परवाने निलंबित करण्यात आले असून १३ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याशिवाय छत्रपती संभाजीनगर येथे १.९२ लाखांची संशयास्पद मिठाई, अहिल्यानगर आणि नाशिक रोड येथे संशयास्पद गूळ व तूप जप्त करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com