Marathi Board Decision Saam TV
मुंबई/पुणे

Marathi Board Decision: पुढील २ महिन्यांत दुकानावर मराठी पाट्या लावा; सुप्रीम कोर्टाचा आदेश

Supreme Court Marathi Board Decision: निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

Ruchika Jadhav

Maharashtra News:

दुकानांच्या पाट्यांवरील नाव इंग्रजी किंवा हिंदीबरोबरच मराठी भाषेतही आणि मोठ्या अक्षरात असावीत, अशी मागणी मनसेनं लावून धरली होती. यावर बऱ्याचदा आंदोलनंही झाली. यानंतर राज्य सरकारनं तसा आदेशही काढला. मात्र, या आदेशाला काही व्यापाऱ्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या आव्हानावर सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिलाय. महाराष्ट्रातील सर्व दुकांनांवर मराठी भाषेतच पाट्या असाव्यात, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी मुंबईतील सर्व व्यापाऱ्यांना मराठीत सूचनाफलक लावणे बंधनकारक केले होते. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मुंबईतील व्यापाऱ्यांना मराठीत नवीन फलक लावण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दोन महिन्यांची मुदत दिली आहे, दरम्यान या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

न्यायालयाचे मनापासून आभार

राज ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे मनापासून आभर मानले आहेत."पुढील 2 महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. 'मराठी पाट्या' ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली." असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय.

हा लढा न्यायालयात का नेला?

"मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं ह्यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला?", असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

"महाराष्ट्रात असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे.",असं त्यांनी म्हटलं.

"असो, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ह्या मुद्द्यावर संघर्ष केला, आता सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी, आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे."

दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू

पुढे दुकानदारांना सल्ला देत त्यांनी लिहिलं की, "दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका. 'मराठी पाट्या' ह्याबाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही सतर्क राहिलात तसंच पुढे देखील राहिलं पाहिजेत." अशा शब्दांत राज ठाकरेंनी मराठी पाट्यांवरील निर्णयाचे स्वागत केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT