चित्रपटांपेक्षा मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या जास्त आहे. चित्रपट एकदा येऊन निघून जातात. पण मालिका आणि मालिकेतील पात्र दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येतात आणि त्यांचे मनोरंजन करतात. त्यामुळे मालिकेतील ही पात्र प्रेक्षकांच्या रोजच्या जगण्यातील भाग होऊन जातात. स्टार प्रवाहवरील मालिकांचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. चॅनेलवरील मालिकांचा टीआरपी ही बराच मोठा आहे. नुकताच ९ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर पर्यंतचा टीआरपीचे आकडे समोर आले आहेत.
काही दिवसांपूर्वी टेलिकास्ट झालेली ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने पुन्हा एकदा टीआरपीमध्ये बाजी मारली आहे. ही मालिका ४ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेने अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. टीआरपी तडका या इन्स्टाग्राम पेजने नुकताच मराठी मालिकेंच्या टीआरपीचा चार्ट शेअर केला आहे. गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यात ही ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने टीआरपीमध्ये बाजी मारली आहे.
तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे मुख्य भूमिकेत असलेल्या या मालिकेने या आठवड्यात पहिलं स्थान पटकावलं आहे. मालिकेला ६.८ इतके पॉइंट्स मिळाले आहेत. तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळेसह मालिकेत शुभांगी गोखले, योगेश केळकर, संजीवनी जाधव, इरा परवडे आणि अपूर्वा नेमळेकर या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
मालिकेने अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांमध्ये अढळ स्थान निर्माण केले आहे, त्यामुळे सध्या या मालिकेची प्रचंड चर्चा होते. या मालिकेआधी टीआरपी चार्टमध्ये ‘आई कुठे काय करते’ आणि ‘ठरलं तर मग’ या दोन मालिका होत्या, पण आता ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका आल्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर कोणती मालिका अधिराज्य गाजवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शेअर केलेल्या चार्टमध्ये, पहिल्या स्थानावर ‘प्रेमाची गोष्ट’, दुसऱ्या स्थानावर ‘ठरलं तर मग’ तर तिसऱ्या स्थानावर ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेने स्थान मिळवलं आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, नुकताच जाहीर झालेल्या टीआरपी चार्टमध्ये सर्वांची लाडकी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी चार्टमध्ये टॉप १० मध्ये आपल्याला स्टार प्रवाहच्याच मालिका पाहायला मिळत आहे. तर १५ व्या स्थानावर झी मराठीची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने स्थान मिळवलं आहे. या मालिकेला ३.४ इतके पॉईंट्स प्राप्त झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.