PMPML Bus google
मुंबई/पुणे

PMPML Bus: पीएमपीएमएल चालकांवर कठोर कारवाई, बस चालवताना मोबाईल वापर आणि तंबाखू सेवन केल्यास होणार निलंबन

PMPML Drivers: प्रवासी आणि कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या तक्रारीनंतर, पीएमपीएमएल ने त्यांच्या चालकांना वेळोवेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन टाळण्यासंदर्भात इशारे दिले आहेत, आणि नियमांचे पालन करण्यास कडक सूचना जारी केल्या आहेत.

Dhanshri Shintre

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) च्या एका चालकाला बस चालवताना आयपीएल सामना पाहिल्यामुळे निलंबित करण्यात आले. या घटनेनंतर, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कडक सुचना जारी केल्या आहेत. कर्मचाऱ्यांना कामकाजी वेळेत कोणत्याही प्रकारची असंवेदनशील किंवा निष्काळजी वर्तणूक दाखवण्यास मनाई करण्यात आली आहे, तसेच कडेकोट नियम लागू केले आहेत.

पीएमपीएमएलने आपल्या कर्मचाऱ्यांना कडक सुचना जारी केल्या आहेत. त्यांच्या चालकांना आणि वाहकांना गाडी चालवताना मोबाईल फोन वापरणे, तसेच तंबाखू-पान मसाला यांचे सेवन करणे, अशा कारणांसाठी निलंबित केले जाऊ शकते. पीएमपीएमएलने आपल्या कर्मचाऱ्यांना हे निर्देश दिले आहेत.

यापूर्वीही, पीएमपीएमएलने त्यांच्या चालकांना आणि वाहकांना कर्तव्यावर असताना मोबाईल फोन वापरण्यास, हेडफोन घालण्यास किंवा तंबाखू आणि पान मसाला खाण्यास मनाई करण्याचे कडक निर्देश जारी केले होते. या नियमांचे उल्लंघन केल्यास दोन महिन्यांचे निलंबन केले जाईल परिपत्रकात म्हटले होते.

सध्या पीएमपीएमएलकडे ९४०० चालक कर्मचारी आहेत, ज्यात ४४०० कंत्राटी चालकांचा समावेश आहे. आता पीएमपीएमएलने चालक किंवा वाहकांविषयीच्या तक्रारींसाठी व्हाट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. प्रवाशांनी तक्रारींचे फोटो/व्हिडिओ, बस क्रमांक, मार्ग क्रमांक, ठिकाण, तारीख आणि वेळ पीएमपीएमएलच्या ईमेल complaints@pmpml.org, व्हॉट्सअॅप क्रमांक 9881495589 वर पाठवण्याची विनंती केली आहे किंवा पीएमपीएमएलच्या जवळच्या डेपोमध्येही पुराव्यासह तक्रारी सादर केल्या जाऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT